जीर्ण झालेले जुने बांधकाम तसेच नूतनीकरण सुरू असणाऱ्या इमारतीवर कारवाही करू नये खासदार सुप्रिया सुळे यांची आयुक्त शेखर सिंग यांना सूचना.
स्थानिक पदाधिकारीचे एक शिष्टमंडळ यांना विश्वासात घेवून चर्चेतून मार्ग काढण्याच्या सूचना.
पिंपरी चिंचवड दिनांक: 2 ऑक्टोंबर 2024 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड येथील दारुल उलुम जामिया इनामिया काळेवाडी येथे जुना मदरसा आणि मशीदचे काही प्रमाणात नुतनिकरण करण्यात येत होते.मात्र हे बांधकाम महापालिकेने अनधिकृत बांधकाम म्हणून पाडले.पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरात मुस्लीम धार्मिक स्थळाविरुद्ध सुरु असलेल्या अन्यायकारक कारवाई बाबत शहरातील एक शिष्टमंडळाने संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांची भेट घेवून मध्यरात्री झालेल्या कार्यवाही बद्दल माहिती दिली.या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ आयुक्त शेखर सिंग यांना फ़ोन कॉल करून कार्यवाही चा आढावा घेतला.शहरातील जीर्ण झालेले जुने बांधकाम तसेच नूतनीकरण सुरू असणाऱ्या कोणत्याही धार्मिक इमारतीवर कारवाही करू नये अश्या सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी आयुक्त शेखर सिंग यांना दिल्या. तसेच स्थानिक पदाधिकारीचे एक शिष्टमंडळ यांना विश्वासात घेवून चर्चेतून मार्ग काढवा असे सांगितले.यावर आयुक्त शेखर सिंग यांनी स्थानिक शिष्टमंडळ सोबत चर्चा करण्यास सहमती दाखवली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक शहरअध्यक्ष इम्रान शेख म्हणाले ’पिंपरी चिंचवड शहरात सुमारे दीड लाख अनधिकृत बांधकामे आहेत.परंतु कारवाई करण्यासाठी महापालिकेला केवळ मुस्लिम समाजाचा मदरसाच दिसला. बहुसंख्यांक समाजाच्या मेंदूत मुस्लीम द्वेष रुजवण्यासाठी अश्या प्रकारच्या कारवाई कायद्याला धरून फक्त मुस्लिमांवर केल्या जातात हे अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. मुस्लीम समाजाच्या विरोधात एकतर्फी कारवाई करून समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न हा शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. भाजपा-शिवसेना (शिंदे गट) व अजित पवार गटाच्या वतीने अल्पसंख्य समाजाला वारंवार त्रास दिला जात आहे.
अतिक्रमण विभागाने सदर कारवाई हि रात्री ११.३० वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत करण्यात आली.अशा प्रकारची रात्री होणारी कारवाई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा झाली आहे.
अतिक्रमण विभागाने सदर कारवाई हि रात्री ११.३० वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत करण्यात आली.अशा प्रकारची रात्री होणारी कारवाई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा झाली आहे.