मोबाईल शॉप मालकाकडून महिला कार्यकर्तीचा विनयभंग; कोंढव्यात गुन्हा दाखल
Share
1 Min Read
Pccnews Pune Crime
SHARE
मोबाईल शॉप मालकाकडून महिला कार्यकर्तीचा विनयभंग; कोंढव्यात गुन्हा दाखल
पुणे : कोंढवा परिसरात आंबेडकरी चळवळीतील एका महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका मोबाईल शॉपचा मालक फय्याज युसूफ खान याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
दि. २१ मे २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ७५, ७८, ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तक्रारीनुसार, आरोपीने संबंधित महिलेला “बहोत सोशल किडा है, मैं यहाँ का भाई हूँ” असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली, विनयभंग केला तसेच धमकी दिल्याचा आरोप आहे.
दरम्यान, आरोपीचा भाऊ फिरोज खान हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असल्याची चर्चा परिसरात असून त्याचा पोलिस एन्काऊंटर झाल्याचेही सांगितले जात आहे. आरोपीकडून परिसरातील नागरिकांना वारंवार त्रास दिला जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत अशी माहिती परिसरातून येत आहे
या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंबेडकरी कार्यकर्ते व नागरिकांकडून करण्यात येत असून, संबंधितांविरोधात तक्रारी असल्यास नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.