राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

PCC NEWS

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

पिंपरी चिंचवड दिनांक : ०४ बुधवार ०३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री.अजित दामोदर गव्हाणे तसेच महिला अध्यक्षा प्रा.सौ.कविता आल्हाट व शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन तसेच पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष श्री.अजित दामोदर गव्हाणे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्षा प्रा.सौ.कविता आल्हाट, कार्याध्यक्ष राहुल भोसले, शाम लांडे, प्रशांत शितोळे, फजल शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रसाद शेट्टी, ज्ञानेश्वर कांबळे, विशाल काळभोर,प्रवक्ते विनायक रणसुभे, खजिनदान दिपक साकोरे, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, उज्वला ढोरे, ज्योती गोफणे, सविता धुमाळ, महिला प्रदेश सरचिटणीस शोभा पगारिया, महिला प्रदेश सचिव शिला भोंडवे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, अर्बन सेल अध्यक्ष मनिषा गटकळ, ग्राहक सेल अध्यक्षा पल्लवी पांढरे, संघटीका मिरा कदम, भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा सारिका पवार, आशा मराठे, युवक कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, अक्षय माछरे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, उपाध्यक्ष तुकाराम बजबळकर, राजीव क्षीरसागर, जहीर खान, प्रदीप गायकवाड, बाबासाहेब चौधरी, बापू कातळे, प्रशांत देवकाते, रविंद्र सोनवणे, कामगार सेल कार्याध्यक्ष युवराज पवार, सरचिटणीस राजू चांदणे, महिला उपाध्यक्षा मेधा पळशीकर, नीलम कदम, स्मिता वाघुले, ललिता गवले, धनाजी तांबे, सुनिल आडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment