शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरेंकडून रमजान ईदच्या शुभेच्छा !
ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची भेट घेतली; मुस्लिम बांधवांना भेटून दिल्या शुभेच्छा.
पिंपरी दि. 11 (प्रतिनिधी) मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मावळ लोकसभेतील सर्व मुस्लिम बांधवांसाठी आनंदपर्व असलेल्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद म्हणजेच आपसातला बंधुभाव आणि त्यागाची भावना यांचे प्रतीक असल्याचे उमेदवार संजोग वाघेरे पाटलांनी म्हटले आहे.
उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, मोहम्मद पानसरे, फजल शेख यांची गळाभेट घेवून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पिंपळे गुरव येथील मुलानी, माजी नगरसेविका निगार बारस्कर यांचीही भेट घेवून ईद च्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक, राजीव गांधी नगर आणि चिंचवड येथील मस्जितमध्ये जावून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी गळा भेट घेवून ईदच्या मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या. ईदचा उत्साह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात बघायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड मशिदीमध्ये नमाज पठणासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच गळा भेट घेत मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत ईद साजरी करीत आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरेंकडून रमजान ईदच्या शुभेच्छा !ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची भेट घेतली; मुस्लिम बांधवांना भेटून दिल्या शुभेच्छा.पिंपरी दि. 11 (प्रतिनिधी) मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मावळ लोकसभेतील सर्व मुस्लिम बांधवांसाठी आनंदपर्व असलेल्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद म्हणजेच आपसातला बंधुभाव आणि त्यागाची भावना यांचे प्रतीक असल्याचे उमेदवार संजोग वाघेरे पाटलांनी म्हटले आहे.उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, मोहम्मद पानसरे, फजल शेख यांची गळाभेट घेवून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पिंपळे गुरव येथील मुलानी, माजी नगरसेविका निगार बारस्कर यांचीही भेट घेवून ईद च्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक, राजीव गांधी नगर आणि चिंचवड येथील मस्जितमध्ये जावून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी गळा भेट घेवून ईदच्या मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या. ईदचा उत्साह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात बघायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड मशिदीमध्ये नमाज पठणासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच गळा भेट घेत मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत ईद साजरी करीत आहेत.