Goldman प्रशांत दादा सपकाळ फाउंडेशन तर्फे बाबुरावजी घोलप महाविद्यालयास व्हीलचेअर भेट.
माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवी येथील Goldman प्रशांत दादा सपकाळ फाउंडेशन च्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता दोन व्हीलचेअर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयास भेट देण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड विभाग शहर प्रमुख मा. तुषार कामठे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका मा. सुलक्षणा शीलवंत, Goldman प्रशांत दादा सपकाळ फाउंडेशनचे संस्थापक व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा. प्रशांत सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे पण वाचा : देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याला प्राधान्य- CM Eknath Shinde.
या वेळी मा. प्रशांत सपकाळ यांनी सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती आपले उत्तरदायित्व लक्षात घेता दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ही मदत करत असल्याची भावना व्यक्त करत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी Goldman प्रशांत दादा सपकाळ फाउंडेशनच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल मा. प्रशांत सपकाळ यांचे अभिनंदन करत या व्हीलचेअर बद्दल आभार व्यक्त केले.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या सकाळ सत्र प्रमुख पिंपळे मॅडम, डॉ संगीता जगताप, श्री विजय घारे, सोनल कदम ,डॉ ढगे सर,शितोळे मॅडम, विशाल तळेकर उपस्थित होते.