उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा.

PCC NEWS
1 Min Read

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा.

पुणे दिनांक: 31 ऑक्टोबर 2024 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) अजित पवार यांनी आईसोबतचा फोटो शेअर केला असून, ‘मी आणि माझ्या आईच्या वतीने महाराष्ट्रातील नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा’ अशी पोस्ट केली आहे.

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करत अजित पवार यांनी लिहिले की, “माझ्या आणि माझ्या आईच्या वतीने मी महाराष्ट्रातील माता, शेतकरी, मजूर, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ही दिवाळी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी सुख, समृद्धी आणि भरभराटीची जावो, अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.”

TAGGED:
Share This Article
Leave a comment