अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही.

PCC NEWS

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही.

महासंघाच्या कॅलेंडर चे दादांच्या हस्ते प्रकाशन.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाजासाठी चे कार्य उत्तम प्रकारे सुरु असून संघाच्या सामाजिक कार्यास सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

समाज संघटित करत असताना विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा संकल्प मोलाचा असल्याचे ही चंद्रकांतदादा म्हणाले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कॅलेंडर प्रकाशनाच्या अनौपचारिक कार्यक्रम प्रसंगी त्यांनी महासंघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी भाजप चे प्रदेश प्रवक्ते व महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर,महासंघाचे युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड , सरचिटणीस गणेश मापारी , युवक सरचिटणीस सचिन वडघुले , अनिकेत भगत
उपाध्यक्ष सुधा पाटील, सरचिटणीस भाग्यश्री बोरकर, कसबा अध्यक्ष वैशाली सोनवणे, पर्वती उपाध्यक्ष शुक्रा दुर्गे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्ही समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोतच पण त्याच बरोबर रोजगार मेळावा, महिलांसाठी विविध स्पर्धा, उद्योजक मेळावा, व्यवसाय मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवत असल्याचे सौ. भाग्यश्री बोरकर यांनी सांगितले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment