बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची स्थापना करून मातंग समाजाचे स्वप्न महायुती सरकारने पूर्ण केले – आमदार अमित गोरखे.
Share
1 Min Read
SHARE
बार्टी च्या धर्तीवर आर्टी ची स्थापना करून मातंग समाजाचे स्वप्न महायुती सरकारने पूर्ण केले – आमदार अमित गोरखे.
मातंग समाजाची गेली कित्येक दिवसांच्या मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे. Barti च्या धर्तीवर आर्टि ची स्थापना करून मातंग समजातील उपेक्षित घटकांना एक नवी संजीवनी देण्याचे कार्य या महायुती सरकारने केले असून यापुढे मातंग समाजातील युवक,युवती भविष्यात IAS, कलेक्टर, झालेले आपल्याला नक्की दिसतील असे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी म्हटले आहे ,तसेच या महायुती सरकारचे आभार मानले व संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज महायुती सरकारच्या पाठीशी खंबीरपणे राहील अशी या निमित्ताने ग्वाही दिली आहे..
शिक्षणा पासून वंचित होत चाललेला समाज आर्टि च्या माध्यमातून पुन्हा एकदा सुशिक्षित होईल. आर्टि ची स्थापना हा मातंग समाजातील एक महत्त्वाचा विषय असल्याने महायुती सरकारने या मुद्याला लवकर न्याय दिला त्या बद्दल मातंग समजातून महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.