विद्यानगर झोपडपट्टी बचाव कृती समितीच्या अध्यक्ष पदी विठ्ठल कळसे.

PCC NEWS

विद्यानगर झोपडपट्टी बचाव कृती समितीच्या अध्यक्ष पदी विठ्ठल कळसे.

युनूस खतीब 9420554065

पिंपरी चिंचवड दि.८ – प्रतिनिधी विद्यानगर झोपडपट्टी बचाव कृती समितीच्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

ही संपूर्ण निवड प्रक्रियेद्वारे मतदान घेऊन झाली. या वेळी बोलताना विठ्ठल कळसे म्हणाले मी प्रभाग क्र.१० विद्यानगर परशुराम नगर परिसरात सामाजिक क्षेत्रात काम केले असून स्थानिक नागरिकांनी मतदान करून मला मोठ्या बहुमताने निवडून दिले.त्या बद्दल मी सर्वांचा आभारी
आहे.

आपण मताच्या माध्यमातून माझ्यावर टाकलेली अध्यक्ष पदाच्या जबाबदारीला मी कोणत्याही प्रकारे
राजकारण, विश्वासघात, किंवा तडा जाऊ देणार नाही असे मनोगत कळसे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले समिती मधील पदाधिकारी सभासद महिला पुरुष सर्वांना विश्वासात घेऊनच आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून समाज हितासाठी पुढील दिशा ठरवण्यात येईल कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाही कोणत्याही परिस्थितीत समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारण न करता स्थानिक सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे हक्काच स्वतःच घरे वाचवण्या साठी मी समितीमधील सर्वांना सोबत घेऊन
सातत्याने प्रयत्न करणार आहे.

यासाठी तुमच्या सोबत मी व सर्व समिती सदैव एस.आर.ए. प्रकल्प मधील लाभार्थ्यांना आहे त्याच ठिकाणी घरे मिळाली पाहिजेत त्या साठी प्रयत्नशील असणार आहोत असे विठ्ठल कळसे म्हणाले.

विध्यानगर प्रभाग क्र.१० मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा कोणताही आदेश नसताना स्वतःची उपजीविका भागवण्या साठी एस.आर.ए.सारख्या योजना प्रायव्हेट बिल्डरच्या घशात घालून गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचे घरे घालण्यासाठी बेत केला जात असल्याचे काही सर्वसामान्य नागरिकांकडून माहिती उपलब्ध झाल्याने झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात नागरिकांची महत्वाची बैठक आयोजित केली होती.

सर्व सामाजिक राजकीय पक्षाच्या वतीने प्रभाग क्र.१० चिंचवड विद्यानगर हनुमान मंदिर जवळ मनपा समाजहॉल या असून ठिकाणी पुढील दिशा व नागरिकांना जन जागृत करण्यासाठी नुकतीच बैठकपार पडली आयोजित केली होती.

नवनिर्वाचित कार्यकारणी पुढील प्रमाणे.

अध्यक्षः विठ्ठलभाऊ बाबुराव कळसे

(उपाध्यक्ष) संभाजी नाईकनवरे,

सचिन सकाटे, धर्मेंद्र गावडे

(कार्याध्यक्ष) दयानंद मोरे, सय्यद पटेल, संजय

शिंदे (खजिनदार) विजय चव्हाण, मंगेश चौधरी

(सह्वजिनदार) अमर थिटे, नितीन दौंडकर,

सचिन विटकर (सेक्रेटरी) आतिश पात्रे, गंगाधर

काळे, किशोर गुंजाळ (उपसेक्रेटरी) करामत

खान, प्रीतम तेलंग (प्रसिद्धी प्रमुख) आसिफ

खान, ओमकार तुपे, गणेश फुलखिले ( हिशोब

तपासणीस) निलेश भिगवणकर, मारुती पवळे,

अरुण पात्रे (सल्लागार) मा. नगरसेवक राम पात्रे,

सुमन दौंडकर, राम उत्तेकर, सरस्वती गोफणे,

अनुसया दणाणे, गजराबाई मोरे, सुनिता

अलकोट, नारायण गायकवाड, सुभाष

कांबळे, भारत कोकरे, फिरोज चौधरी, अंबुबाई

जमादार (सदस्य) रमेश कसबे, नंद गायकवाड,

मयुर पात्रे,आदित्य तर्न, रोहित माने, अश्फाक

शेख, आकाश जावळे, अभिषेक आवळे रणजीत

शेंडगे आदी असणार आहे.

अशी माहिती विठ्ठलभाऊ बाबुराव कळसे यांनी दिली.

TAGGED:
Share This Article
Leave a comment