डिजीटल मिडियाची बातमी परदेशातही वाचली जाते – प्रा. विश्वनाथ गरुड. 

PCC NEWS

डिजीटल मिडियाची बातमी परदेशातही वाचली जाते – प्रा. विश्वनाथ गरुड. 

पिंपरी : १२  जानेवारी २०२३ ( प्रतिनिधी ) डिजीटल मीडियात कंटेंट चांगल्या प्रकारे तयार होतो. पण, लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अडचणी येतात. त्यासाठी व्हायरल होणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. कला,मीम्स, विनोद आणि एकतर्फी लेख प्रचंड व्हायरल होतात. हे पत्रकारितेच्या दृष्टीने घातक आहे पण वास्तव आहे. त्यामुळे स्वतःच्या वेबसाईटची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन प्रा. विश्वनाथ गरुड यांनी केले.

पत्रकार दिनानिमित्त अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघ व पिंपरी-चिंचवड डिजीटल मीडियाच्या वतीने आयोजित उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. गरुड यांनी ‘आजचा डिजिटल मीडिया’यावर पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, युवा सेनेचे चेतन पवार, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मारुती भापकर, रेखा दर्शिले, रोमी संधू, संदीप भालके, तानाजी बारणे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यावेळी उपस्थित होते.

प्रा. विश्वनाथ गरुड म्हणाले की, डिजिटल मीडियातील बातमी परदेशात देखील वाचली जाते. वर्तमानपत्र, वृत्तवाहिनी बघण्यात मर्यादा येतात. वेबसाईटची संपूर्ण मालकी स्वतःकडे राहते. सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामाध्यमातून लोक वेबसाईटला फॉलो करतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. डिजीटल मीडियाची वाचक संख्या वाढली आहे. वेबसाईट काढण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. डिजीटल मीडियामध्ये काम करणाऱ्यांना कोण वाली नाही. डिजीटल मीडियाला नोंदणीच्या प्रक्रियेत आणले पाहिजे. जेणेकरून त्यांना वाली भेटेल. हे पत्रकार समाजाचे प्रश्न सोडवितात पण त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोण नाही. नोंदणी केल्यावर अधिकृतता येईल. सरकारी जाहिराती मिळत नाहीत. सरकारने यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे.

डिजीटल मीडियातून उत्त्पन्न अतिशय नगण्य आहे.
डिजीटल मीडियात कंटेंट चांगल्या प्रकारे तयार होतो. पण, लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अडचणी येतात. सोशल मीडिया, गुगल रँकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.त्यासाठी व्हायरल होणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. कला, मीम्स, विनोद आणि एकतर्फी लेख प्रचंड होतात. आता एकतर्फी लेख प्रचंड व्हायरल होतात. हे पत्रकारितेच्या दृष्टीने घातक आहे पण वास्तव आहे. एकांगी लिखानाला मागणी वाढली आहे. स्वतःच्या वेबसाईटची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजेत. वेबसाईटवरील बातम्या वाचण्यासाठीही शुल्क आकारले पाहिजे. वेबसाईटवरील बातम्या सत्य असतात, बातम्यांवर विश्वासार्हता आहे. पण, वृत्तपत्राएवढी अधिक विश्वासार्हता वाढण्यासाठी काही कालावधी लागेल,असेही प्रा. गरुड म्हणाले.

Contents
डिजीटल मिडियाची बातमी परदेशातही वाचली जाते – प्रा. विश्वनाथ गरुड. पिंपरी : १२  जानेवारी २०२३ ( प्रतिनिधी ) डिजीटल मीडियात कंटेंट चांगल्या प्रकारे तयार होतो. पण, लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अडचणी येतात. त्यासाठी व्हायरल होणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. कला,मीम्स, विनोद आणि एकतर्फी लेख प्रचंड व्हायरल होतात. हे पत्रकारितेच्या दृष्टीने घातक आहे पण वास्तव आहे. त्यामुळे स्वतःच्या वेबसाईटची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन प्रा. विश्वनाथ गरुड यांनी केले.पत्रकार दिनानिमित्त अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघ व पिंपरी-चिंचवड डिजीटल मीडियाच्या वतीने आयोजित उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. गरुड यांनी ‘आजचा डिजिटल मीडिया’यावर पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले, आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, युवा सेनेचे चेतन पवार, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, मारुती भापकर, रेखा दर्शिले, रोमी संधू, संदीप भालके, तानाजी बारणे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यावेळी उपस्थित होते.प्रा. विश्वनाथ गरुड म्हणाले की, डिजिटल मीडियातील बातमी परदेशात देखील वाचली जाते. वर्तमानपत्र, वृत्तवाहिनी बघण्यात मर्यादा येतात. वेबसाईटची संपूर्ण मालकी स्वतःकडे राहते. सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामाध्यमातून लोक वेबसाईटला फॉलो करतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. डिजीटल मीडियाची वाचक संख्या वाढली आहे. वेबसाईट काढण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. डिजीटल मीडियामध्ये काम करणाऱ्यांना कोण वाली नाही. डिजीटल मीडियाला नोंदणीच्या प्रक्रियेत आणले पाहिजे. जेणेकरून त्यांना वाली भेटेल. हे पत्रकार समाजाचे प्रश्न सोडवितात पण त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोण नाही. नोंदणी केल्यावर अधिकृतता येईल. सरकारी जाहिराती मिळत नाहीत. सरकारने यामध्ये लक्ष घालणे आवश्यक आहे.डिजीटल मीडियातून उत्त्पन्न अतिशय नगण्य आहे. डिजीटल मीडियात कंटेंट चांगल्या प्रकारे तयार होतो. पण, लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अडचणी येतात. सोशल मीडिया, गुगल रँकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.त्यासाठी व्हायरल होणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. कला, मीम्स, विनोद आणि एकतर्फी लेख प्रचंड होतात. आता एकतर्फी लेख प्रचंड व्हायरल होतात. हे पत्रकारितेच्या दृष्टीने घातक आहे पण वास्तव आहे. एकांगी लिखानाला मागणी वाढली आहे. स्वतःच्या वेबसाईटची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजेत. वेबसाईटवरील बातम्या वाचण्यासाठीही शुल्क आकारले पाहिजे. वेबसाईटवरील बातम्या सत्य असतात, बातम्यांवर विश्वासार्हता आहे. पण, वृत्तपत्राएवढी अधिक विश्वासार्हता वाढण्यासाठी काही कालावधी लागेल,असेही प्रा. गरुड म्हणाले.
TAGGED:
Share This Article
Leave a comment