उद्योग नगरीत शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची लगबग सुरू.

PCC NEWS

उद्योग नगरीत शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची लगबग सुरू.

६ व ७ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजन.

पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ६ व ७ जानेवारी २०२४  रोजी उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी -चिंचवड शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. नाट्य संमेलनाचे आयोजक असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची लगबग सुरू झाली असून मोरया गोसावी क्रीडा संकुल वर या तयारीने वेग घेतल्याचे दिसते.

अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वाटचालीतील हे शतकी संमेलन असल्याने या संमेलनाला विशेष महत्व आहे. राज्यभरात या नाट्य संमेलनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत,६ व ७ जानेवारी २०२४ रोजी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन’ चिंचवड येथील मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले आहे.

आठवड्याभरावर येवून ठेपलेल्या या नाट्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाचे काम मोरया गोसावी क्रीडा संकुल वर जोरदार तयारी सुरू आहे. मुख्य सभामंडपांतील काम ५० टक्के पूर्ण झाले असून १ जानेवारीपर्यंत संमेलन स्थळांवरील संपूर्ण काम पूर्ण होईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर मुख्य सभामंडप हा ६० बाय ८० फुट इतके मोठे बांधण्यात आला आहे. तसेच लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी भव्य  बालमंच देखील उभारण्यात येत आहे.

तब्बल दोन दिवस उद्योग नगरीत रंगणाऱ्या या १०० व्या अ . भा. म. नाट्य संमेलनासाठी आयोजक उत्सुक असून, तयारी विषयी बोलताना आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, नाट्य संमेलनाच्या तयारीने आता वेग घेतला आहे. मुख्य सभामंडप आणि बालमंच या शिवाय पिंपरी – चिंचवड शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह (चिंचवड), निळू फुले नाट्यगृह (सांगवी), गदिमा नाट्यगृह (प्राधिकरण), अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी) असे एकानंदरीत सहा  ठिकाणी १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रंगभूमीवर गाजलेली व्यवसायिक नाटके, बालनाट्य, उल्लेखनीय एकांकिका, प्रायोगिक नाटके,संगीत रजनी, संगीत नाटक यांसह ६४ विविध सांस्कृतिक व नाट्य विषयक कार्यक्रम व नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment