अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार.

PCC NEWS

अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार.

पुणे,दि.०३: पुणे शहरातील नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरूवारी सायंकाळी ७ वाजता पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी गुरूवारी रात्रीच पुणे पोलीस आयुक्तालयातील अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

दरम्यान, शुक्रवारी त्यांनी पुणे शहरातील सर्वच अवैध धंद्यावर सर्जिकल स्ट्राइक करण्यात येणार आहे असे स्पष्टपणे सांगितले आहे.

नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यात पदभार स्वीकारल्यानंतर अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. गुरूवारी रात्रीपासूनच सर्वच ठिकाणचे अवैध धंदे बंद झाल्याची चर्चा शुक्रवारी दिवसभर रंगली होती.

अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्या दिवशी पासूनच रुद्रावतार धारण केल्यामुळे अनेक समाजकंटकांचे, गुन्हेगारांचे तसेच अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

TAGGED:
Share This Article
Leave a comment