औंध जिल्हा रुग्णालयात भोंगळ कारभार ! आमदार अश्विनी जगताप यांनी दिले कडक कारवाईचे आदेश.

PCC NEWS

औंध जिल्हा रुग्णालयात भोंगळ कारभार !

आमदार अश्विनी जगताप यांनी दिले कडक कारवाईचे आदेश..

पिंपरी चिंचवड दिनांक:२४ मार्च २०२४ ( विशेष प्रतिनिधी) औंध जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याच्या तक्रारी येत होत्या मात्र आता कहरच झाला. एका परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांची प्रकृती गंभीर झाली आहे. इंदिरा वसाहतीत राहणारे श्री. दत्तू सोनाजी सोनवणे यांना दि.21 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान औंध जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांचे हात पाय सुजले व पोट फुगलेले होते त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दोन-तीन दिवस ऍडमिट करण्याचा सल्ला दिला.

त्यांच्यावर रुग्णालयात दोन-तीन दिवस उपचार सुरू असतानाच काल म्हणजेच दि. 23 मार्च रोजी औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची रक्त तपासणी केली व दत्तू सोनवणे यांना रक्त चढवण्याची सूचना तेथील परिचारिकेला दिली. मात्र संबंधित परिचारिकेने निष्काळजीपणा करत दत्तू सोनवणे यांचा रक्तगट ए पॉझिटिव असताना त्यांना बी पॉझिटिव रक्त चढविले. तर त्यांच्या शेजारील रुग्ण दगडु कांबळे यांना बी पॉझिटिव रक्तगट असताना ए पॉझिटिव रक्त चढवले. दोन्ही रुग्णांना रक्त चढवीत असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत असल्याने हा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र परिचारिकेच्या या गंभीर चुकीमुळे आज दोन्हीही रुग्णांची प्रकृती अत्यंत नाजूक असून दोन्ही रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी तातडीने घटनास्थळी जात रुग्णांची व नातेवाईकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करत झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. या गंभीर प्रकरणाची दखल आमदार अश्विनी जगताप यांनी घेतली.

यावेळी नातेवाईकांनी सांगितले की रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे व संबंधित नर्सच्या निष्काळजीपणामुळे दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालय प्रशासन त्या नर्सला पळून लावून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी आमदार अश्विनी जगताप यांच्याकडे केली.

तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश व दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार अश्विनी जगताप यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आपण व्यक्तिगत लक्ष घालणार असून लवकरात लवकर संबंधित परिचारिके विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी व रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

Contents
औंध जिल्हा रुग्णालयात भोंगळ कारभार ! आमदार अश्विनी जगताप यांनी दिले कडक कारवाईचे आदेश..पिंपरी चिंचवड दिनांक:२४ मार्च २०२४ ( विशेष प्रतिनिधी) औंध जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याच्या तक्रारी येत होत्या मात्र आता कहरच झाला. एका परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांची प्रकृती गंभीर झाली आहे. इंदिरा वसाहतीत राहणारे श्री. दत्तू सोनाजी सोनवणे यांना दि.21 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान औंध जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांचे हात पाय सुजले व पोट फुगलेले होते त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दोन-तीन दिवस ऍडमिट करण्याचा सल्ला दिला.त्यांच्यावर रुग्णालयात दोन-तीन दिवस उपचार सुरू असतानाच काल म्हणजेच दि. 23 मार्च रोजी औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची रक्त तपासणी केली व दत्तू सोनवणे यांना रक्त चढवण्याची सूचना तेथील परिचारिकेला दिली. मात्र संबंधित परिचारिकेने निष्काळजीपणा करत दत्तू सोनवणे यांचा रक्तगट ए पॉझिटिव असताना त्यांना बी पॉझिटिव रक्त चढविले. तर त्यांच्या शेजारील रुग्ण दगडु कांबळे यांना बी पॉझिटिव रक्तगट असताना ए पॉझिटिव रक्त चढवले. दोन्ही रुग्णांना रक्त चढवीत असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत असल्याने हा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र परिचारिकेच्या या गंभीर चुकीमुळे आज दोन्हीही रुग्णांची प्रकृती अत्यंत नाजूक असून दोन्ही रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी तातडीने घटनास्थळी जात रुग्णांची व नातेवाईकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करत झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. या गंभीर प्रकरणाची दखल आमदार अश्विनी जगताप यांनी घेतली.यावेळी नातेवाईकांनी सांगितले की रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे व संबंधित नर्सच्या निष्काळजीपणामुळे दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालय प्रशासन त्या नर्सला पळून लावून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी आमदार अश्विनी जगताप यांच्याकडे केली.तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश व दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार अश्विनी जगताप यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आपण व्यक्तिगत लक्ष घालणार असून लवकरात लवकर संबंधित परिचारिके विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी व रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
TAGGED:
Share This Article
Leave a comment