“पाटी” एकांकिकेने पटकावला लक्ष्मण जगताप करंडक.

PCC NEWS

“पाटी” एकांकिकेने पटकावला लक्ष्मण जगताप करंडक.

पिंपरी, दि. २२ – लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकनेते लक्ष्मणभाऊ कला आणि क्रीडा अकादमीच्या वतीने लक्ष्मण जगताप करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये एकदम कडक नाट्यसंस्था मुंबईच्या पाटी एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान पटकाविला. अभिनेते पुष्कराज चिरपुटकर, आमदार अश्विनी जगताप, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात १९, २० व २१ फेब्रुवारी असे तीन दिवस ही एकांकिका स्पर्धा पार पडली. लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. त्याला राज्यभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत एकदम कडक नाट्यसंस्था मुंबईच्या “पाटी” एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान पटकावला. स्वामी नाट्यांगण, डोंबिवलीची “फक्त २ मिनीटं “दुसरी, तर मराठवाडा विद्यापीठाचे वाणिज्य महाविद्यालय पुणेची “सिनेमा”ही एकांकिका तिसरी आली.

विजेत्यांना सुप्रसिध्द नाट्यचित्रपट अभिनेते पुष्कराज चिरपुटकर, आमदार अश्विनी जगताप, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष राजू दुर्गे, कोशाध्यक्ष संतोष निंबाळकर, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र संयोजक नरेंद्र आमले, सहसंयोजक संजय हिरवे, सांस्कृतिक प्रकोष्ठ पिंपरी-चिंचवड संयोजक विजय भिसे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, स्मिता बारवकर, नितीन गावडे आदी उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment