शहरात होणार “भव्य जिल्हास्तरीय डान्स” स्पर्धा
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने आयोजन.शहरात होणार “भव्य जिल्हास्तरीय डान्स” स्पर्धा
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने आयोजन.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या हस्ते झाले पोस्टर अनावरण.पिंपरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशच्या वतीने संपूर्ण राज्यभर शरद क्रीडा महोत्सव जल्लोषात सुरू आहे.त्याचाच भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहर युवक राष्ट्रवादीच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी भव्य जिल्हास्तरीय सोलो व ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण १ लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे व पारितोषिके तसेच सहभागींना सन्मानपत्र आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पोस्टरचे अनावरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या हस्ते झाले आहे, अशी माहिती युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील बालगोपाल ते वयोवृद्धांना नृत्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी शरद क्रीडा महोत्सव अंतर्गत याचे आयोजन केले आहे. ही स्पर्धासोमवारी (दि.१५) चिंचवडच्या एलप्रो सिटी मॉल येथील तिसऱ्या मजल्यावरील प्रेक्षागृहात होणार असून यात वयाची अट नसणार आहे. त्यामुळे शहरातील बालगोपाल, युवक-युवती, महिलांसह वयोवृद्ध यांनी सहभागी व्हावे, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी साठी ८६००६६३६६२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.याचे आयोजन राष्ट्रवादी युवकच्या वतीने शहराध्यक्ष इम्रान भाई शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश संघटक राहुल पवार, कार्याध्यक्ष सागर तापकीर, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष राहुल बागडे यांनी केले आहे.याचे उदघाटन सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, मच्छिंद्र तापकीर, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या हस्ते होणार आहे.
बक्षीस वितरणाला इंडिया आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती.सोमवारी सायंकाळी सहा वाजता बक्षीस वितरण होणार आहे. बक्षीस वितरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे साहेब, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, शिवसेना नेते संजोग वाघेरे, आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या हस्ते झाले पोस्टर अनावरण.
पिंपरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशच्या वतीने संपूर्ण राज्यभर शरद क्रीडा महोत्सव जल्लोषात सुरू आहे.त्याचाच भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहर युवक राष्ट्रवादीच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी भव्य जिल्हास्तरीय सोलो व ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण १ लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे व पारितोषिके तसेच सहभागींना सन्मानपत्र आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पोस्टरचे अनावरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसाहेब, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या हस्ते झाले आहे, अशी माहिती युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील बालगोपाल ते वयोवृद्धांना नृत्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी शरद क्रीडा महोत्सव अंतर्गत याचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा
सोमवारी (दि.१५) चिंचवडच्या एलप्रो सिटी मॉल येथील तिसऱ्या मजल्यावरील प्रेक्षागृहात होणार असून यात वयाची अट नसणार आहे. त्यामुळे शहरातील बालगोपाल, युवक-युवती, महिलांसह वयोवृद्ध यांनी सहभागी व्हावे, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी साठी ८६००६६३६६२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
याचे आयोजन राष्ट्रवादी युवकच्या वतीने शहराध्यक्ष इम्रान भाई शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश संघटक राहुल पवार, कार्याध्यक्ष सागर तापकीर, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष राहुल बागडे यांनी केले आहे.
याचे उदघाटन सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, मच्छिंद्र तापकीर, राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या हस्ते होणार आहे.
बक्षीस वितरणाला इंडिया आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती.