मावळ लोकसभा मतदार संघ हा कामगारांचा, मला भाजपतर्फे उमेदवारी द्यावी – यशवंत भोसले

PCC NEWS

मावळ लोकसभा मतदार संघ हा कामगारांचा, त्यांचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी मला भाजपतर्फे उमेदवारी द्यावी अशी मागणी यशवंत भोसले यांनी केली..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ मार्च २०२४ मावळ लोकसभा मतदार संघात जवळपास ६०% कामगार आहेत, त्याकामगारांचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी मला भाजपतर्फे मावळ मधून उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पिंपरी येथील पत्रकार परिषदेत केली आहे.

कामगार नेते यशवंत भोसले हे गेली ३० वर्षापासून कामगारांच्या पत्येक कार्यात कार्यरत असून जवळपास ०९ ते १० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत.

शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर आणि श्रम मंत्रालय कामगार कायदे पुनर्गठन समिती नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन या भारतीय जनता पर्टीशी सलग्न असलेल्या कामगार संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून समितीवर यशवंत भोसले हे काम पाहत आहेत.

मावळ लोकसभा मतदार संघामध्ये पिंपरी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, कर्जत, उरण, मावळ (तळेगाव) इत्यादी शहरामध्ये औद्योगिकीकरण विस्तारले असून लाखोंच्या संख्येने कामगार व त्यांचे परिवार स्थिरावलेले असून त्यांच्याच प्रश्नासाठी मला उमेदवारी द्यावी मी शंभर टक्के विजयी होवू शकतो असा मला आत्मविश्वास आहे असा विश्वास यशवंत भोसले यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

Pccnews

Contents
मावळ लोकसभा मतदार संघ हा कामगारांचा, त्यांचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी मला भाजपतर्फे उमेदवारी द्यावी अशी मागणी यशवंत भोसले यांनी केली..प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ मार्च २०२४ मावळ लोकसभा मतदार संघात जवळपास ६०% कामगार आहेत, त्याकामगारांचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी मला भाजपतर्फे मावळ मधून उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पिंपरी येथील पत्रकार परिषदेत केली आहे.कामगार नेते यशवंत भोसले हे गेली ३० वर्षापासून कामगारांच्या पत्येक कार्यात कार्यरत असून जवळपास ०९ ते १० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत.शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर आणि श्रम मंत्रालय कामगार कायदे पुनर्गठन समिती नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन या भारतीय जनता पर्टीशी सलग्न असलेल्या कामगार संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून समितीवर यशवंत भोसले हे काम पाहत आहेत.मावळ लोकसभा मतदार संघामध्ये पिंपरी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, कर्जत, उरण, मावळ (तळेगाव) इत्यादी शहरामध्ये औद्योगिकीकरण विस्तारले असून लाखोंच्या संख्येने कामगार व त्यांचे परिवार स्थिरावलेले असून त्यांच्याच प्रश्नासाठी मला उमेदवारी द्यावी मी शंभर टक्के विजयी होवू शकतो असा मला आत्मविश्वास आहे असा विश्वास यशवंत भोसले यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
TAGGED:
Share This Article
Leave a comment