संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ रविवारी “महाविकास आघाडीचा मेळावा”

PCC NEWS

संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ रविवारी “महाविकास आघाडीचा मेळावा”

 सचिन अहिर, शशिकांत शिंदे, संग्राम थोपटे, बाळाराम पाटील यांची उपस्थिती.

पिंपरी (प्रतिनिधी) :- मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे (पाटील) यांच्या प्रचारार्थ रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा होणार आहे, अशी माहिती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर यांनी दिली.

रहाटणी येथील विमल गार्डन बँक्वेट हॉल येथे सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड शहर महाविकास आघाडीचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) संपर्कप्रमुख तथा आमदार सचिनभाऊ अहिर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेसचे भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे, शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार बाळाराम पाटील, स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ.श्री.शिवानंद भानुसे,  आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे आदी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या हस्ते निवडणूक प्रचारपत्रकाचे प्रकाशन, तसेच एलईडी व्हॅनचे उद्घाटन होणार आहे. लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी एकजुटीने सामोरे जात आहे. शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे प्रचारप्रमुख योगेश बाबर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment