27 सेकंदात 40 हजार सॅनिटरी नॅपकिनचे वाटप! महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.

PCC NEWS

27 सेकंदात 40 हजार सॅनिटरी नॅपकिनचे वाटप! महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.

युग फाउंडेशन व व्ही कन्स्ट्रकट सी एस आर चा विक्रम.

23 फेब, युग फाउंडेशनने व्ही कन्स्ट्रकट सी एस आर च्या सहकार्याने, अंजुमन ए इस्लाम स्कूल, बंड गार्डन, पुणे येथे सर्वात कमी वेळेत सर्वाधिक सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्याचा विक्रम प्रस्थापित करण्याचा बहुमान मिळवला आहे.

तब्बल 40 हजार सॅनिटरी नॅपकिनचे वाटप अवघ्या 27.02 सेकंदात करण्यात आले, या विक्रमाला महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डने अधिकृतपणे मान्यता दिली आहे.

या विक्रमाचे परीक्षण एमआयटी डब्ल्यूपी विद्यापीठाचे संचालक डॉ. महेश थोरवे यांनी केले, तसेच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचे कार्याध्यक्ष डॉ. महिबूब सय्यद, सचिव स्नेहा कुलकर्णी, उपाध्यक्ष सतीश राठोड आणि समृद्धी चव्हाण
यांनी या उपक्रमाचे निरीक्षण करून रेकॉर्ड म्हणून मान्यता दिली.

“गिव्ह हर कॉन्फिडन्स” या उपक्रमा अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या शाळेतील मुलींना सेमिनार द्वारे मासिक पाळीच्या संदर्भात माहिती देऊन त्यांच्या आरोग्या विषयी असलेल्या समस्या सोडवणे, आहार, व्यायाम, स्वच्छतेचे महत्व, आजार, उपचार आणि निदान या सर्वांची सखोल माहिती मुलींना देणे असा आहे 2019 पासून युग फाऊंडेशनच्या सहयोगाने व्ही कन्स्ट्रकट सी एस आर हा उपक्रम यशस्वी रित्या राबवत आहे.

व्ही कन्स्ट्रकट प्रा.ली. ही पुणे स्थित बांधकाम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान कंपनी आहे, जी जागतिक स्थरावर बांधकाम उद्योगाला तांत्रिक कौशल्य आणि सेवा प्रदान करते.

व्ही कन्स्ट्रकट प्रा.ली चे ऑपरेशन्स आणि CSR प्रमुख
मनोज देशमुख, यांनी या वेळी सांगितले की, आमचे मोबिलायझेशन पार्टनर, युग फाऊंडेश यांच्या बहुमोल सहयोगाने “गिव्ह हर कॉन्फिडन्स” उपक्रमाद्वारे सरकारी शाळेत किशोर वयीन मुलींना मेंस्ट्रोल हायजिन विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने सेमिनार आणि संपूर्ण वर्षासाठी सॅनिटरी नॅपकिन्सचे चे वाटप आम्ही मागील चार वर्षापासून करत आहोत, आत्ता पर्यंत आम्ही 8 लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केलेले आहे.

सामाजिक जबादारी म्हणून आम्ही शिक्षण, आरोग्य, महीला सशक्तीकरण, पर्यावरण, ग्रामीण विकास अश्या विविध क्षेत्रात आमचे योगदान देत आहोत.

आणि आनंदाची बाब म्हणजे, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड ने आज आमच्या उपक्रमाची नोंद रेकॉर्ड मध्ये घेतल्याने
आमच्या उपक्रमाची व्याप्ती आणखीच वाढली आहे.

हा सन्मान आमच्या साठी ऊर्जा आणि प्रोत्साहन देणारा आणि समाजासाठी आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देणारा ठरणार आहे. हा बहुमान प्रदान केल्याबद्दल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि त्यांच्या टीमचे आभार.

तसेच युग फाऊंडेशनच्या कठोर परिश्रम आणि संशोधना मुळे
आमचा हा उपक्रम अधिक प्रभावी बनवण्यास मोलाची साथ लाभली त्यामुळे त्यांचे ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत.

¹युग फाउंडेशनच्या विश्वस्त प्रतीक्षा चरण यांनी शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला, गरीब कुटुबातील मुलींचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यांना ज्ञान आणि आत्मविश्वासाने सक्षम बनवण्याची आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत.

या वेळी त्यांनी व्ही कन्स्ट्रकट प्रा.ली तर्फे मिळत असलेल्या मदत आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
आणि विश्वास व्यक्त केली की या रेकोर्ड मुळे आम्हाला आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.


TAGGED:
Share This Article
Leave a comment