संपूर्ण भारतात छत्रपतींचा जिरे टोप परिधान करावा इतकी कोण्या राजकाराण्याची लायकी आहे का…? इम्रान शेख युवक शहर अध्यक्ष.

PCC NEWS

संपूर्ण भारतात छत्रपतींचा जिरे टोप परिधान करावा इतकी कोण्या राजकाराण्याची लायकी आहे का…?  इम्रान शेख युवक शहर अध्यक्ष.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवारच्या वतीने प्रफुल पटेल तसेच महायुतीच्या नेत्याच्या विरोधात मूक आंदोलन.

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घालून त्यांचं स्वागत केलं.यानंतर आता विविध स्तरातून टीकेची झोड उठली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरीचिंचवड च्या वतीने प्रफुल पटेल तसेच महायुतीच्या नेत्याच्या विरोधात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात मूक निषेध आंदोलन केले.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालण्याचं प्रफुल्ल पटेल यांचं धाडस कसं झालं.उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का? असा संतप्त सवाल युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख यांनी केला.

यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले “छत्रपती शिवरायांची भूमिका करताना अनेकलोक,अगदी शाळकरी मुलं त्यांची वेशभूषा करतात,डोक्यावर जिरेटोप घालतात.तो अभिनय असतो,नक्कल असते.सामान्य माणसांना हे समजत म्हणून कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत.

मात्र प्रफुल्ल पटेलांनी जे केलेलं आहे तो शुद्ध लाळघोटेपणा आणि लाचारीची परिसीमा आहे.
जिरेटोप हे हातात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो,परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महराजांचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही:महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला,आणि भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही!”

कामगार नेते काशीनाथ नखाते,सागर तापकीर,मेघराज लोखंडे,कमलेश वाळके,सचिन निंबाळकर,अथर्व शिंदे,यशस नितेश,मयूर खरात,आशिष खत्री,अजय पवार,राजेश हरगुडे, बाबीत बनसोडे,नवनाथ साबळे,हनिफ अत्तर,अभिषेक गिरी,नितीन मोरे,अशरफ शेख,मोसीम शेख,सत्यम साळवे,नियमात शेख,शाहिद शेख,प्रदीप जगताप,सलमान खान ,मोसीम शेख,ऋषिकेश गरडे,बबीता बनसोडे,सूरज देशमाने, रेखा मोरे,समाधान अचलखांब आणि मोठ्या संख्येनी यूवक पदाधिकारी उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment