हिंदूत्त्ववादी आमदार महेश लांडगे यांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ सोहळा – भगव्या पताका, वांद्यांचा निनाद अन् प्रचंड उत्साहात मिरवणूक.

PCC NEWS
हिंदूत्त्ववादी आमदार महेश लांडगे यांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ सोहळा पताका, वांद्यांचा निनाद अन् प्रचंड उत्साहात मिरवणूक.

पिंपरी । प्रतिनिधी अत्यंत भक्तीमय… भगवामय… आणि मंगलमय वातावरण… फुलांचा वर्षाव अन्‌ ढोल-ताशांच्या निनादामध्ये चौका-चौका होणारे स्वागत… फटाक्यांचे तुफान आतिषबाजी आणि ‘जय सियाराम’ चा गगणभेदी नारा… अशा उत्साहाच्या आणि भक्ती-भावाच्या वातावरणात तब्बल ५ लाख हून अधिक पिंपरी-चिंचवडकर रामभक्तांनी सहभागी होत महाराष्ट्रातील सर्वात मोठी रथयात्रा यशस्वी केली.

राम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये हिंदूत्ववादी आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी भव्य ‘रथयात्रा’ आयोजित केली होती. त्याला रामभक्त, हिंदू बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही गेल्या सात दिवसांपासून आमदार लांडगे यांनी विविध धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथून रथ यात्रेला सुरूवात झाली. हजारो दुचाकी व चारचाकी, चार विजयरथ, राम मंदिर प्रतिकृती, मर्दानी खेळ, डी.जे. ढोल पथक, झांज पथक, श्रीराम जिवंत देखावा, गंगा आरती, सनई चौघडे, महाबली हनुमान, कलश यात्रा, आतिषबाजी यासह हिंदू धर्माबाबत जागृती करण्यासाठी विविध देखावे सादर करण्यात आले.

आमदार लांडगे यांचा पायी प्रवास…
निगडी ते चिखली या रथ यात्रेच्या मार्गावर हजारो दुचाकी व चारचाकी सहभागी झाल्या. तसेच, रथ यात्रेच्या दोन्ही बाजुंनी सहभागी होत नागरिक, रामभक्त सहभागी झाले. पायी चालणाऱ्या रामभक्तांसोबत आमदार महेश लांडगे यांनी निगडी ते चिखली रामायण मैदानापर्यंत पायी प्रवास केला. तसेच, कारसेवक नंदकुमार सातुर्डेकर व सहकाऱ्यांची राम रथामध्ये मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांनी दोन्ही बाजुंनी फुलांचा वर्षाव करीत रथ यात्रेचे स्वागत केले. पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आणि वाहतुकीचे अचूक नियोजन केले.

श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरात होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा तमाम हिंदू बांधवांच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. हिंदूत्व आणि अखंड भारताचा दुवा असलेले श्रीराम मंदिर हे यापुढील हजारो पिंढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे. या मंगलमय सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड अगदी राममय झाले आहे. तमाम भारतवासीयांना या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. मनामनात राम असावा… घराघरांत उत्सव साजरा करावा… असे आवाहन करतो. – महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

TAGGED:
Share This Article
Leave a comment