पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या.

PCC NEWS

पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या.

पिंपरी चिंचवड दिनांक :२८ जानेवारी २०२४ पिंपरी चिंचवडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका ओयो हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास या महिलेची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

पिंपरी चिंचवड शहरात हिंजवडी परिसरात ओयो हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीची मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.वंदना दिवेदी (वय 26 वर्ष) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. वंदना दिवेदी मागील दोन दिवसापासून तिच्या मित्रासोबतसुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉज मध्ये वास्तव्यास होती.

वंदना दिवेदी ही साँफ्टवेअर इंजिनिअर होती. लखनऊवरुन आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या केली.

यानंतर तो पळून मुंबईला जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यासाठी वापरले गेलेले पिस्टल देखील जप्त करण्यात आले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment