जिल्हाधिकारी डाॅ.सुहास दिवसे यांनी मावळ लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा कार्यालयास देऊन केली पाहणी.

PCC NEWS

जिल्हाधिकारी डाॅ.सुहास दिवसे यांनी मावळ लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा कार्यालयास देऊन केली पाहणी.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी आज मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी भेट दिल्या. त्यामध्ये ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील मतदान साहित्य वाटप व स्विकृती केंद्र आणि निगडी प्राधिकरण येथील डॉ.हेडगेवार भवनातील स्ट्राॅग रूमची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सोयी सुविधा देण्याबाबत सूचना दिल्या.
या भेटी दरम्यान त्यांचेसमवेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, तहसीलदार जयराज देशमुख, नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप,प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

२०६ पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आज मतदान यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले होते, त्याचीही पाहणी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केली व प्रशिक्षकासमवेत संवाद देखील साधला.

२०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ इमारतीमध्ये एकूण ३९९ मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या ३६४८०६ इतकी आहे.

Contents
जिल्हाधिकारी डाॅ.सुहास दिवसे यांनी मावळ लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभा कार्यालयास देऊन केली पाहणी.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी आज मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी भेट दिल्या. त्यामध्ये ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील मतदान साहित्य वाटप व स्विकृती केंद्र आणि निगडी प्राधिकरण येथील डॉ.हेडगेवार भवनातील स्ट्राॅग रूमची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सोयी सुविधा देण्याबाबत सूचना दिल्या. या भेटी दरम्यान त्यांचेसमवेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, तहसीलदार जयराज देशमुख, नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप,प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.२०६ पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आज मतदान यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले होते, त्याचीही पाहणी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केली व प्रशिक्षकासमवेत संवाद देखील साधला.२०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ इमारतीमध्ये एकूण ३९९ मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या ३६४८०६ इतकी आहे.
TAGGED:
Share This Article
Leave a comment