खंडणी प्रकरणी विद्यानगर येथील तिघांवर गुन्हा.

PCC NEWS

खंडणी प्रकरणी विद्यानगर येथील तिघांवर गुन्हा.

फळ विक्रीचा व्यवसाय पुढे चालू ठेवायचा असेल तर ५० हजार रुपयांची खंडणी रोख स्वरूपात घेत, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फळ विक्रीचा व्यवसाय पुढे चालू ठेवायचा असेल तर ५० हजार रुपयांची खंडणी रोख स्वरूपात घेत, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सारा प्रकार मार्च २०२२ ते २३ मे २०२४ या कालावधीत चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डन जवळील रस्त्यालगत घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अश्फाक जलील शेख (वय ३० रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पिंपरी पोलिसांनी एका तीस वर्षे महिलेसह अरबाज शेख (वय ३०) व आकाश वाकळे (वय २५) सर्व राहणार विद्यानगर चिंचवड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा प्रती हक्क कोणाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे याचे भांडवल करत तिघांनी संगनमत करून फिर्यादीला फळ विक्रीचा व्यवसाय पुढे चालू ठेवायचा असेल तर दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल असं सांगून शिवीगाळ करत कोयता दाखवून दमदाटी केली.

तसेच महिलेचा पती जेलमधून सुटल्यानंतर जीवे मारून टाकेल,अशी धमकी देत दर महिना दोन हजार असे एकूण ५० हजार रुपयांची खंडणी घेतली आहे.

यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

TAGGED:
Share This Article
Leave a comment