मावळमध्ये विकास कामांचा धडाका, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते साडे एकविस कोटींच्या कामाचे भूमिपूजन.

PCC NEWS

मावळमध्ये विकास कामांचा धडाका, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते साडे एकविस कोटींच्या कामाचे भूमिपूजन.

मावळ – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. अंदर मावळमधील डोंगरवाडी ते धनगर पठार अति दुर्गम भागातील नागरिकांसाठी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, विविध विकास कामांचे लोकार्पण खासदार बारणे यांच्या हस्ते झाले. मावळमधील अनेक गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ते झाल्याने नागरिकांनी खासदार बारणे यांचे आभार मानले.

खासदार बारणे यांनी अंदर मावळ भागातील गावांचा दौरा करत विविध विकास कामाचे भूमिपूजन, लोकार्पण केले. तहसिलदार विक्रम देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, टाटा पावरचे फुलसुंदर साहेब, मनोहर म्हात्रे, सुनिल मोरे, सरपंच छाया हेमाडे उपस्थित होते. तसेच वेहरगांव दहिवली,मळवली,वाकसई देवघर व लोणावळा शहरातील तुंर्गाली भागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. या वेळी माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, श्रीधर पुजारी, आरपीआयचे नेते सुर्यकांत वाघमारे, दत्ता केदारी,विशाल हुलावळे,सुनिल हगवणे,सुनिल मोरे,सागर हुलावळे, वेहरगावं सरपंच वर्षाताई मावकर, पाटन सरपंच प्रवीण तिकोने
मळवली सरपंच अस्लम शेख, वाकसई सरपंच मोनाली जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी लवकर सुरू झालेला दौरा रात्री साडे नऊ वाजता दौरा संपला. रात्री उशीर हेऊनही ग्रामस्थ,गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी सर्वाधिक निधी डोंगरभाग, आदिवासी पाडे असलेल्या मावळ तालुक्याला दिला आहे. वडेश्वर, नागाठली, कुसुवली, डाहुली, खांड कुसुर, निळसी, सावळा, इंगळून, कशाळ किवळे, भोईरे, कल्हाट, निगडे, कोडींवडे, टाकले बु.,घोनशेच कचरेवाडी येथील भूमिपूजने केली. डोंगरवाडी ते धनगर पठार या अती दर्गम भागात आजपर्यंत रस्ता नव्हता. या भागात खासदार बारणे यांच्या हस्ते रस्त्याचे काम सुरु झाले. रस्ता होत असल्याने आनंद झालेल्या धनगर बांधवांनी घोंगडी देऊन खासदार बारणे यांचा सत्कार केला. या रस्त्यांमुळे गावक-यांची ये-जा करण्याची चांगली सोय होणार आहे. मतदारसंघात नियमित दौरे, लोकांना सतत भेटणे, लोकांमध्ये मिसळने, लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध खासदार अशी बारणे यांची ओळख आहे.

खासदार बारणे म्हणाले की, मावळ तालुका मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. कमी लोकवस्ती असलेली गावे आहेत. या गावांमधील अंतर्गत रस्ते पक्के नाहीत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. गावातील रस्ते विकास करण्यावर भर दिला. वाड्या, वस्त्यांपर्यंत रस्ते करण्यास प्राधान्य दिले आहे. सर्वाधिक निधी मावळसाठी दिला आहे. दीनदयाळ योजनेअंतर्गत दुर्गम भागातील गावांमध्ये वीज पोहोचविली आहे.दुर्गम भागात  स्वातंत्र्या नंतर रस्ते लाईट केल्याचे समाधान होते.केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील कशाळे कडाव ते मावळ तालुक्यातील खांडी कुसुर मार्गे भीमाशंकर पर्यंत जाणारा मार्ग होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी सोय होणार आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment