पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा भाजपचा निर्धार.

PCC NEWS

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा भाजपचा निर्धार.

पिंपरी, दि. 19 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी रात्री काळभोरनगर येथे सिझन बँक्वेट हॉल येथे झाली. त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, मावळ लोकसभा मतदारसंघ समन्वयक सदाशिव खाडे, पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख अमित गोरखे, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सुजाता पालांडे, मावळ लोकसभा मतदारसंघ विस्तारक भूषण जोशी, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, शीतल शिंदे, अनुप मोरे, माऊली जाधव, कुणाल लांडगे, राजू दुर्गे, तुषार हिंगे, अतुल इनामदार, नंदू कदम, अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, शैलेश मोरे, संजय कणसे, राजू बाबर, नीलेश अष्टेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजप कार्यकर्ते जीवाचे रान करतील, अशी ग्वाही अमित गोरखे यांनी यावेळी दिली. मताधिक्य देऊ त्या प्रमाणात पिंपरी विधानसभा मतदारसंघाला बारणे यांनी विकास निधी दिला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात शुक्रवारपासून सुमारे 125 नमो सभा घेण्यात येतील. त्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार बारणे यांनी केलेल्या कामांची माहिती पोहोचवण्यात येईल, असे आमदार खापरे यांनी सांगितले.

खासदार बारणे म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीचे आहेत. हिंदुत्वाला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. गेल्या दहा वर्षात मतदारसंघात आपण भरीव विकास कामे केली आहे. या तुलनेत विरोधकांकडे दाखवण्यासाठी काहीही काम नाही. आता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली आहे.

गेल्या दहा वर्षात मतदारसंघात केलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती खासदार बारणे यांनी यावेळी दिली. केलेली विकास कामे, मतदारांशी सातत्याने ठेवलेला संपर्क व महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे आपण विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.

‘फिर एक बार, मोदी सरकार’, ‘अब की बार, चार सौ पार’ या घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment