बालभारती हा जीवनातील पहिला हस्तस्पर्श-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे.

PCC NEWS

बालभारती हा जीवनातील पहिला हस्तस्पर्श-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे.

पुणे दि.२८ : शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा बालभारती हा पहिला हस्तस्पर्श असतो, ज्याचा ठसा मनावर चिरकाल उमटतो, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी केले.

बालभारतीच्या ५७ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक महेश पालकर, कृष्णकुमार पाटील, डॉ. नंदकुमार बेडसे, माजी संचालक वसंत पाटील, गोविंद नांदेडे, डॉ. शकुंतला काळे, भाऊ गावंडे, भारती देशमुख, उज्ज्वला ढेकणे, रवींद्र माने आदी उपस्थित होते.

श्री. मांढरे म्हणाले,आपली परंपरा खूप मोठीअसतांना ती त्याच ताकदीने पुढे नेण्याची जबाबदारीही पेलावी लागते. ती ताकद आपण निर्माण करू शकलो नाही तर भविष्यात परंपरेचा डोलारा कोसळून पडायला वेळ लागणार नाही. त्यामुळे निव्वळ परंपरेवर अवलंबून न राहता काळानुसार बदलत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

माजी शिक्षण संचालक श्री. नांदेडे म्हणाले, बालभारतीमध्ये काही वर्षे नोकरी करणे हा माझ्या आयुष्यातील सुंदर अनुभव होता. इथे येऊन अनेक दिग्गजांच्या सहवासात जीवनाला आकार मिळाला. माझ्यासारख्या कोट्यवधी विद्यार्थ्यांवर बालभारतीचे ऋण आहेत. बालभारती हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. या संस्थेचा सर्वांनाच अभिमान आहे.

यावेळी बालभारतीमधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment