आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी मीनाताई जावळे ह्यांची नियुक्ती.

PCC NEWS

आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी मीनाताई जावळे ह्यांची नियुक्ती.

पिंपरी चिंचवड दिनांक:०४ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र प्रभारी गोपाल भाई इटालिया व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फाटके यांनी मीनाताई चंद्रमनी जावळे यांच्या वर विश्वास दर्शवून आपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एका महिलेला प्रथम अध्यक्षपदाचा मान मिळाला याबद्दल यावेळी सर्वांनी आनंद व्यक्त केला.

मीनाताई जावळे ह्या सामाजिक कार्यामध्ये सतत कार्यरत असतात, त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये मोठे जाळे पसरवले आहे. आकुर्डी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, छ.शिवाजी महाराज जयंतीउत्सव तसेच अनेक उपक्रम मीनाताई उपक्रम राबवत असतात.

आम आदमी पार्टीची सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना पिंपरी चिंचवड सारख्या शहराध्यक्षपदी एका महिलेची संधी देऊन पार्टीने एक नवा पायंडा पाडला असून महिला शक्तीच्या जोरावर पिंपरी चिंचवड मध्ये आम आदमी पार्टीचा महापौर निवडून आणू असा विश्वास नवनियुक्त शहराध्यक्ष मीनाताई जावळे यांनी व्यक्त केला

मीनाताई जावळे यांनी यावेळी त्यांच्या झालेल्या नियुक्ती बद्दल गोपाल भाई इटालिया, अजित फाटके आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment