पुणे कोथरूड परिसरात टोळक्याकडून कोयत्याने वार करत तरूणाची हत्या.

PCC NEWS

पुणे कोथरूड परिसरात टोळक्याकडून कोयत्याने वार करत तरूणाची हत्या.

(विशेष प्रतिनिधी आदिल शेख पुणे) दिनांक १७ पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाची कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 नंतर चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत त्याची हत्या केली.

श्रीनिवास हा त्याचा काही मित्रांसोबत रात्री बाराच्या सुमारास बाहेर गेला होता. यावेळी कर्वेनगर येथील गांधी चौक परिसरात त्याला चार ते पाच जणांच्या टोळीने अडवले व त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. श्रीनिवास सोबत असणारा एक त्याचा मित्र तेथून पळून गेला मातृ श्रीनिवास तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यानंतर आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांनी त्याला जवळपास असणाऱ्या खाजगी दवाखान्यात नेले. मात्र तपासल्या नंतर त्याचा मृत्यू झाला असल्यास डॉक्टरांनी सांगितले.

याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत अलंकार पोलीस स्टेशन येथे सुरू होती.

TAGGED:
Share This Article
Leave a comment