AIF च्या ‘FLIP प्रोग्राम’ची पुण्यात भव्य सांगता पिंपळगाव राजा येथील शिक्षक आकीब सर यांचा शैक्षणिक कार्यासाठी गौरव
पुणे – पिंपरी चिंचवड (युनूस खतीब) अमेरिकन इंडिया फाउंडेशन (AIF) यांच्या वतीने पुणे येथील ज्ञानसागर हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला “Annual Showcase Event – FLIP Program” अत्यंत उत्साहपूर्ण आणि गौरवशाली वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पिंपळगाव राजा (जि. बुलढाणा) येथील युवा शिक्षक आकीब सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काश्मीर येथून आलेले मान्यवर पाहुणे श्री. सोहेल सर यांनी भूषविले. तर पुणे विभागाच्या AIF अध्यक्षा मा. माधुरी मॅडम यांच्या शुभहस्ते आकीब सर यांना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
आकीब सर यांचे मूळ गाव पिंपळगाव राजा, जिल्हा बुलढाणा असून ते सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच उर्दू माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे ते सुपरवायझर म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धतीसह विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनाची दखल घेत AIF कडून हा गौरव करण्यात आला.
शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल
आकीब सर हे शिक्षकाबरोबरच सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहेत. “फातिमा शेख एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी, पिंपळगाव राजा” या संस्थेमार्फत ते गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणप्रसारासाठी कार्यरत आहेत. गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शैक्षणिक मार्गदर्शन तसेच बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
आभार प्रदर्शन
सन्मान स्वीकारताना आकीब सर यांनी मा. माधुरी मॅडम व संपूर्ण AIF टीमचे मनःपूर्वक आभार मानले. AIF टीमने त्यांच्या शाळेला भेट देऊन सकारात्मक व सखोल निरीक्षण केल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास आकीब सर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर यांनीही त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपुलकीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

उज्ज्वल भविष्यासाठी संकल्प
आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच आपले ध्येय असल्याचे आकीब सर यांनी सांगितले. शिक्षणाच्या बळावर भावी पिढीला सक्षम व उज्ज्वल भवितव्य देण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे.