शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाच महापौर होऊ शकत नाही – शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास, शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला शुभारंभ

शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाच महापौर होऊ शकत नाही – शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास, शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला शुभारंभ
पिंपरी – केंद्रात, राज्यात सत्तेत एकत्र असल्याने भाजपसोबत युती करण्यासाठी प्रचंड मेहनत केली. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु, ठीक आहे. त्यांनी गाफील ठेवले. युती केली नाही. शेवटच्या तासाभरात शिवसेनेला ताकदीचे ६१ उमेदवार मिळतील का असे त्यांना वाटले नसेल. पण, शिवसेनेला ताकदीचे उमेदवार मिळाले. त्यामुळे शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाच महापौर होऊ शकत नाही, असा विश्वास शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. प्रचारात टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आपण काय कामे करणार आहोत. हे जनतेला सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले.Sign in to your account