पिंपरी विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज.

PCC NEWS

पिंपरी विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज.

पिंपरी चिंचवड दिनांक : २४ ऑक्टोबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) पिंपरी विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

पीसीसी न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना लोंढे म्हणाले की मी समाजाच्या हितासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी तसेच या कामगार नगरीमध्ये असंख्य प्रश्न आहेत त्याचे योग्यरीत्या निवारण करणे साठी मी दूरदृष्टी ठेवलेली आहे.

संविधानावर चालणाऱ्या या माझ्या भारत देशामध्ये पिंपरी विधानसभेतून मी उमेदवारी अर्ज दाखल केला म्हणून मी बोलतोय आता फक्त एकच ध्यास पिंपरी चा विकास.

चंद्रकांत दादा लोंढे यांचा उमेदवारी अर्ज भरताना सकल मातंग समाजाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख डी पी खंडाळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस तथा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे मा.अध्यक्ष अण्णासाहेब कसबे,शिवशाही व्यापारी संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश डाखोरे,कामगार नेते आबासाहेब मांढरे,शिवशाही व्यापारी संघ भोसरी विधानसभा अध्यक्ष गणेश कलवले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाचे पांडुरंग जगताप, सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड अशोक धायगुडे यांच्या सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment