निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल चे डायरेक्टर वैद्य निलेश लोंढे यांचा आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारासाठी विदेश दौरा.

PCC NEWS
1 Min Read

निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल चे डायरेक्टर वैद्य निलेश लोंढे यांचा आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारासाठी विदेश दौरा.

पिंपरी चिंचवड दिनांक: 11 ऑक्टोंबर 2024 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) साऊथ कोरिया येथील योंगडोग या शहरांमध्ये योंगडोग इंटरनॅशनल हाय वेलनेस फेस्टा याचे आयोजन करण्यात आले , यामध्ये अनेक देशांमधून आयुर्वेद व ट्रडीशनल मेडीसीन द्वारे लोकांचे आरोग्य कसे चांगले ठेवता येतील यासाठी याचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये कॅलिफोर्निया, इटली, भारत जपान या देशातील आयुर्वेदामध्ये काम करणारे लोकांचा समावेश करण्यात आला. यामध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार करता येतील तसेच आजारी पडू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा करण्यात आली , तसेच रुग्णांना आयुर्वेद औषधे ,पंचकर्म , अग्निकर्म या उपचाराच्या माध्यमातून उपचार करण्यात आले. रुग्णांना आयुर्वेदाने सुद्धा कसे तात्काळ वेदना निवारण होते याचा अनुभव घेता आला.

योंगडोग इंटरनॅशनल हाय वेलनेस फेस्टा चे आयोजन याँगडोग गव्हर्मेंट ने केले होते , यामध्ये भारताकडून निर्विकार आयुर्वेदा हॉस्पिटलचे डायरेक्टर वैद्य निलेश लोंढे एमडी आयुर्वेद phd स्कॉलर यांनी सहभाग घेतला , आयुर्वेदामध्ये पंचकर्म उपचार हे कशा पद्धतीने लोकांना बरे ठेवण्यासाठी व बरं करण्यासाठी उपयोगात येतात याविषयी माहिती देण्यात आली.

TAGGED:
Share This Article
Leave a comment