रावेत मधील संस्थाचालकावर “पोक्सो” कायद्याखाली कारवाई करा – प्रा. कविता आल्हाट.
– पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन.
पिंपरी – रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमीच्या संस्थाचालकावर कडक कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले. आरोपींना “पोक्सो” कायद्याखाली जन्मठेपेची शिक्षा द्या आणि पीडित मुलीला न्याय द्यावा. तसेच शाळेवरती कडक निर्बंध घालावेत यामुळे भविष्यात शहरात कोणताही संस्थाचालक असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही अशी मागणीही आल्हाट यांनी केली आहे.
रावेत येथील क्रिएटिव्ह ॲकॅडमी निवासी शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीवर संचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संचालक नौशाद अहमद शेख आणि त्याला मदत करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळात पक्षाच्या
निरीक्षक शितल हगवणे, प्रदेश सचिव शोभा पगारे, वरिष्ठ महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, चिंचवड विभाग अध्यक्ष संगिता कोकाटे, विजया काटे, सपना कदम आदी उपस्थित होते.