राष्ट्रीय पुरस्कार विजेते हात साकारत आहेत शंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे नेपथ्य.

PCC NEWS

राष्ट्रीय पुरस्कार विजेते हात साकारत आहेत शंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे नेपथ्य.

युनूस खतीब पिंपरी चिंचवड 9420554065

Contents
राष्ट्रीय पुरस्कार विजेते हात साकारत आहेत शंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे नेपथ्य.पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ६ व ७ जानेवारी २०२४  रोजी उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी -चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आले आहे.शतक महोत्सवी नाट्य संमेलन असल्याने अनेक अर्थाने हे नाट्य संमेलन महत्वाचे आहे. या नाट्य संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, की या नाट्य संमेलनाचे नेपथ्य (कला दिग्दर्शक) हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नेपथ्यकार श्याम भूतकर करत असल्याची माहिती नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी दिली.गेली ४० वर्ष नाट्य सृष्टीत कार्यरत असणारे श्याम भूतकर हे स्वतः एक नाट्यकलावंत असून वेशभूषा, सेट डिजायनिंग, पेटींग आदी क्षेत्रात ते कार्यरत आहे. ‘पुरूषोत्तम करंडक’ पासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द हिंदी, मराठी नाटक, चित्रपट अशी खूप मोठी आहे.त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा, शाबाना आजमी, अनुपम खेर, अशोक सराफ,  दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आदी दिग्गज कलाकारांच्या चित्रपट व नाटकांच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे.१९८५ साली श्याम भुतकर यांना ‘रावसाहेब’ या मराठी चित्रपटासाठी ‘उत्तम कला दिग्दर्शक’ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. जवळपास ४० वर्ष नाटयक्षेत्रात कला दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर मागील काही वर्षांपासून त्यांनी कला दिग्दर्शनाचे आपले काम थांबवले होते.मात्र जेंव्हा  १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नेपथ्य उभारणी साठी आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी त्यांना विचारलं असता त्यांनी आनंदाने होकार दिला.याविषयी बोलताना नेपथ्यकार श्याम भूतकर म्हणाले, माझा जन्म पुणे शहरातला. माझ्या कारकिर्दीची सुरूवात देखील पुण्यातूनच झाली. गेली ४० वर्ष मी मराठी व हिंदी नाट्य आणि  चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. पण मागील सहा वर्षांपासून मी कला दिग्दर्शनाचं काम थांबवलं होत. अनेक दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ यांच्या सोबत मी काम केलेलं आहे. जेव्हा आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी नाट्य संमेलनाच्या कला दिग्दर्शनासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांच्या चित्रपटांचे देखील मी कला दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे या सोहळ्याचे कला दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळणे हे माझ्यासाठी भाग्यच आहे.

पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ६ व ७ जानेवारी २०२४  रोजी उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी -चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

शतक महोत्सवी नाट्य संमेलन असल्याने अनेक अर्थाने हे नाट्य संमेलन महत्वाचे आहे. या नाट्य संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, की या नाट्य संमेलनाचे नेपथ्य (कला दिग्दर्शक) हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नेपथ्यकार श्याम भूतकर करत असल्याची माहिती नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

गेली ४० वर्ष नाट्य सृष्टीत कार्यरत असणारे श्याम भूतकर हे स्वतः एक नाट्यकलावंत असून वेशभूषा, सेट डिजायनिंग, पेटींग आदी क्षेत्रात ते कार्यरत आहे. ‘पुरूषोत्तम करंडक’ पासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द हिंदी, मराठी नाटक, चित्रपट अशी खूप मोठी आहे.

त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा, शाबाना आजमी, अनुपम खेर, अशोक सराफ,  दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आदी दिग्गज कलाकारांच्या चित्रपट व नाटकांच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे.

१९८५ साली श्याम भुतकर यांना ‘रावसाहेब’ या मराठी चित्रपटासाठी ‘उत्तम कला दिग्दर्शक’ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. जवळपास ४० वर्ष नाटयक्षेत्रात कला दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर मागील काही वर्षांपासून त्यांनी कला दिग्दर्शनाचे आपले काम थांबवले होते.

मात्र जेंव्हा  १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नेपथ्य उभारणी साठी आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी त्यांना विचारलं असता त्यांनी आनंदाने होकार दिला.

याविषयी बोलताना नेपथ्यकार श्याम भूतकर म्हणाले, माझा जन्म पुणे शहरातला. माझ्या कारकिर्दीची सुरूवात देखील पुण्यातूनच झाली. गेली ४० वर्ष मी मराठी व हिंदी नाट्य आणि  चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. पण मागील सहा वर्षांपासून मी कला दिग्दर्शनाचं काम थांबवलं होत. अनेक दिग्गज कलाकार, तंत्रज्ञ यांच्या सोबत मी काम केलेलं आहे. जेव्हा आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी नाट्य संमेलनाच्या कला दिग्दर्शनासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांच्या चित्रपटांचे देखील मी कला दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे या सोहळ्याचे कला दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळणे हे माझ्यासाठी भाग्यच आहे.

Pccnews

TAGGED:
Share This Article
Leave a comment