पिंपरी-चिंचवड ‘आप’ च्या शहर उपाध्यक्षपदी यशवंत कांबळे यांची नियुक्ती.
पिंपरी चिंचवड दिनांक :१९(युनूस खतीब) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, आम आदमी पार्टीने (आप) शहरासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण नेतृत्वाच्या पुनर्रचनेत यशवंत कांबळे यांची पिंपरी-चिंचवड महानगराच्या शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. एक दलित आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्री. प्रकाश जरवाल यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
Arya Mhske; आर्या म्हस्केची रौप्य पदकावर मोहर !!! भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.
यशवंत कांबळे हे पक्ष स्थापनेपासून पक्षासोबत आहेत. त्यांनी आजपर्यंत शहरावर अनेक महत्त्वाचे पदे सांभाळले आहेत, त्यांचा अनुभव व कार्यक्षमता लक्षात घेऊन, ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पक्षाचे संघटन बळकट करणे, आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखणे आणि स्थानिक प्रश्नांवर अधिक ठोस भूमिका घेऊन प्रभावीपणे काम करणे, या उद्देशाने ही नियुक्ती केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
विधानसभा पावसाळी अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांची दमदार कामगिरी.
काल आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहरचा नियुक्ती पत्र व पक्ष प्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आप’ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा. विजय कुंभार होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्ष संघटन बळकट करण्याचे महत्त्व पटवून दिले आणि “आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने तयारीला लागा,” असे आवाहन केले.
पिंपरी चिंचवडमध्ये आपचे जास्तीतजास्त नगरसेवक निवडून आणायचे आवाहन अध्यक्ष रविराज काळे ह्यांनी यावेळी केले.
Respect For Guru; गुरु के प्रति सम्मान व्यक्त करती श्रेया की कथक मंच पर एंट्री।