स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आशिर्वादाने मावळ लोकसभेचा कायापालट करणार.

PCC NEWS

स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आशिर्वादाने मावळ लोकसभेचा कायापालट करणार…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास पिंपरी चिंचवडमध्ये राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून आमची ओळख. 

पिंपरी, (प्रतिनिधी) – स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाचा कायालपालट केला. त्यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्याचे आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर पाऊल ठेवत मावळ लोकसभा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याचे काम करु, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपळे गुरव येथील स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळास आज रविवारी (दि.17) भेट दिली. स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून, नतमस्तक होत अभिवादन केले. त्यांचे आशिर्वाद घेऊन त्यांनी आपल्या प्रचारास सुरूवात केली.

या वेळी ज्येष्ठ मार्गदर्शक विजूअण्णा जगताप, संदेश नवले, संतोष देवकर, अनिताताई तुतारे, मोहन बारटक्के, अमित सुहासे, शांताराम वाघेरे, अमोल नाणेकर, ओंकार पवळे, अक्षय जगताप, महेश वाघेरे, रंगनाथ कापसे, सागर वाघेरे, प्रशांत वाघेरे, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना अभिवादन केल्यानंतर संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, स्मृतीस्थळास भेट दिल्यानंतर जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. आमच्या दोघांची घटमैत्री होती. राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून आम्हाला ओळखले जात होते. राजकीय भूमिका बदलत गेल्या. तरी देखील राजकारणापलिकडील मैत्री कायम होती.‌ कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रमांना आम्ही दोघे एकत्र उपस्थित राहत होतो. माझे वडील भिकू वाघेरे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आयोजित 6 जून रोजीच्या कार्यक्रमास ते पिंपरीगावात आवर्जून उपस्थित राहत.

लक्ष्मणभाऊंनी चिंचवड मतदार संघाचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आणि त्यांचे आशिर्वाद सोबत घेत मी मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार आहे, असा विश्वास संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला.

TAGGED:
Share This Article
Leave a comment