महाराष्ट्रासह १५ राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर.

PCC NEWS

महाराष्ट्रासह १५ राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर.

नवी दिल्ली : आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि राजस्थान या १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक (Rajya Sabha Election 2024) होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज केली. या घोषणेमुळे देशात आगामी निवडणुकांचे बिगूल वाजले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या निवडणुकांसाठी ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ दरम्यान मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होईल.

राज्यनिहाय राज्यसभेच्या जागा.
आंध्र प्रदेशातील – ३, बिहार – ६, छत्तीसगड – १, गुजरात – ४, हरियाणा – १, हिमाचल प्रदेश – १, कर्नाटक – ४, मध्य प्रदेश – ५, महाराष्ट्र – ६, तेलंगणा – ३, उत्तर प्रदेश – १०, उत्तराखंड – १, पश्चिम बंगाल – ५ ओडिशा ३ आणि राजस्थानमधील राज्यसभेच्या ३ जागांचा समावेश आहे. वरील १५ राज्यांमधील ५६ खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत असल्याने ही निवडणूक घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार केंद्रीय मंत्री नारायण राणे, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन आणि प्रकाश जावडेकर (भाजपा) तसेच वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना) आणि कुमार केतकर (काँग्रेस) या ६ खासदारांच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपणार आहे. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो.

१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी तर २ राज्यांतील उर्वरित ६ सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल
रोजी संपत आहे.

२०२४ मध्ये राज्यसभेचे ६८ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात एप्रिलमध्ये कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांची संख्या जास्त म्हणजे ५६ आहे. त्यात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातून प्रत्येकी २ तर राजस्थान, ओडिशा आणि कर्नाटक मधून प्रत्येकी १ असे ९ केंद्रीय मंत्र्यांचा देखील कार्यकाळ संपत आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया,
माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर, केंद्रीय मत्स्य व पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रूपाला, राज्यमंत्री एल मुरुगन,
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, सूक्ष्म लघु आणि मध्यम विभागाचे मंत्री नारायण राणे या ८ मंत्र्यांचा
राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ २ एप्रिलला तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या खासदारकीची मुदत ३ एप्रिल संपणार आहे.

तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, काँग्रेस नेते सय्यद नासीर हुसेन,
समाजवादी पक्षाच्या जया बच्चन, भाजपा मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी, राष्ट्रीय जनता दलाचे मनोजकुमार झा,
बिहारचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार मोदी (भाजप), काँग्रेसचे डॉ. अभिषेक मनु सिंघवी या प्रमुख नेत्यांचा राज्यसभेचा
कार्यकाळ देखील संपत आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment