पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन युवक आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत लोंढे याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात जाहिर प्रवेश…

PCC NEWS

पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहुजन युवक आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत लोंढे याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात जाहिर प्रवेश…

पिंपरी-चिंचवड दिनांक : 04 जानेवारी 2024 पिंपरीतील वंचित बहुजन युवक आघाडीचे शहराचे अध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांच्यासह काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते त्यांच्या गळ्यात पक्षाचे उपरणे टाकून प्रवेश करण्यात आला .त्यांच्या सोबत अशोक भाऊ धायगुडे, शांताराम खुडे, अक्षय उदगीरे, आकाश चव्हाण, आकाश जाधव, विनोद कीर्त, श्रीकांत लोखंडे, तेजस कसबे, श्रेयश लाटकर, प्रथमेश गटकळ, रोहन ओव्हाळ, साहिल खान,आदित्य धायगुडे, शंकर पांढरे, श्याम गायकवाड, अमोल संगमे,देवेंद्र गायकवाड आदींनी देखील प्रवेश केला.

आदरणीय राहूलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने प्रेरित होऊन आम्ही काँग्रेस पक्षासोबत जोडण्याचा निर्णय घेतला आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावर जो अन्याय अत्याचार चालू आहे जो भ्रष्टाचार बोकाळलाय जी अराजकता माजलीय त्याला फक्त काँग्रेस पक्षच थोपवू शकतो गोरगरीब वंचित शोषित कष्टकरी समाजाला सोबत घेऊन काँग्रेस पक्षच पुढे जावून शकतो हा विश्वास आज या देशातील तरूणांना असल्याने आम्ही त्यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले सारखं खंबीर व डॅशिंग नेतृत्व पक्षाला मिळाल्याने अनेक जिल्ह्यात चांगली कामगिरी आपण करत आहोत त्यांच्या कामाचा धडाका पाहून आज तरूण त्यांच्याकडे आकर्षित होत आहे.

आम्ही पक्षाची विचारधारा घराघरात पोहचविण्यासाठी कटिबद्ध असणार आहोत अशी प्रतिक्रीया लोंढे यांनी दिली.

यावेळी कसबा विधानसभेचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, परिवहन विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम,पिंपरी-चिंचवड शहर अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिं. चिं शहर युवक काँग्रेस प्रवक्ता विशाल कसबे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment