महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या पिंपरी चिंचवड कार्यकारिणी मार्गदर्शन मेळाव्याला पदाधिकाऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.

PCC NEWS

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या पिंपरी चिंचवड कार्यकारिणी मार्गदर्शन मेळाव्याला पदाधिकाऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.

महाराष्ट्र प्रांताध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश प्रमुख मा. डाॅ. सौ. दिपा चक्रबोर्ती यांच्या आदेशानुसार , पिंपरी चिंचवड शहर (सामाजिक न्याय) विभागाच्या कार्यकरणीचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती तथा प्रदेश प्रमुख आल्यानंतर भव्य आतिषबाजी व हलगी वादनाने स्वागत करण्यात आले, व त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सेल्फी स्टॅन्ड चे अनावरण स्वतः प्रदेश प्रमुख यांचा फोटो काढून करण्यात आले.

सर्व महापुरुषांना वंदन करून गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली.

या मेळाव्यात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तक्रार पेट्याचे अनावरण करण्यात आले व तसेच पदाधिकाऱ्यांना सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी असलेले ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश प्रमुख डॉ सौ दीपा चक्रबोर्ती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच पिंपरी चिंचवड डॉक्टर सेलच्या प्रमुख डॉ. मनीषा गरड यांनी रुग्णांना येणाऱ्या अडचणी कशाप्रकारे सोडवता येतात यावर उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले.

सदरची बैठक, मा. श्री. चंद्रकांत दादा लोंढे प्रदेश उपाध्यक्ष (सामाजिक न्याय विभाग) व ॲड. अशोक धायगुडे, शहर प्रमुख (सामाजिक न्याय विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

देश आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी, सध्याच्या हुकुमशाही मोदी सरकारला सत्तेवरून पायउतार करावेच लागेल. त्या अनुशंगाने, मा. प्रदेश प्रमुख आणि सन्माननीय मान्यवर यांचे मार्गदर्शन झाले.
व वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Pk

Contents
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या पिंपरी चिंचवड कार्यकारिणी मार्गदर्शन मेळाव्याला पदाधिकाऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद.महाराष्ट्र प्रांताध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश प्रमुख मा. डाॅ. सौ. दिपा चक्रबोर्ती यांच्या आदेशानुसार , पिंपरी चिंचवड शहर (सामाजिक न्याय) विभागाच्या कार्यकरणीचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती तथा प्रदेश प्रमुख आल्यानंतर भव्य आतिषबाजी व हलगी वादनाने स्वागत करण्यात आले, व त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सेल्फी स्टॅन्ड चे अनावरण स्वतः प्रदेश प्रमुख यांचा फोटो काढून करण्यात आले.सर्व महापुरुषांना वंदन करून गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली.या मेळाव्यात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तक्रार पेट्याचे अनावरण करण्यात आले व तसेच पदाधिकाऱ्यांना सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी असलेले ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश प्रमुख डॉ सौ दीपा चक्रबोर्ती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच पिंपरी चिंचवड डॉक्टर सेलच्या प्रमुख डॉ. मनीषा गरड यांनी रुग्णांना येणाऱ्या अडचणी कशाप्रकारे सोडवता येतात यावर उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. सदरची बैठक, मा. श्री. चंद्रकांत दादा लोंढे प्रदेश उपाध्यक्ष (सामाजिक न्याय विभाग) व ॲड. अशोक धायगुडे, शहर प्रमुख (सामाजिक न्याय विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.देश आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी, सध्याच्या हुकुमशाही मोदी सरकारला सत्तेवरून पायउतार करावेच लागेल. त्या अनुशंगाने, मा. प्रदेश प्रमुख आणि सन्माननीय मान्यवर यांचे मार्गदर्शन झाले. व वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
TAGGED:
Share This Article
Leave a comment