खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर.
मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना (Mp Shrirang Barne) उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षाकडून आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारणे यांची ही तिसरी निवडणूक आहे.
खासदार श्रीरंग बारणे मागील दहा वर्षांपासून मावळचे प्रतिनिधित्व संसदेत करत आहेत. 2014, 2019 मध्ये ते मोठ्या मताधिक्याने मावळमधून निवडून गेले. आता तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने खासदार बारणे यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने मावळवर दावा केला होता. परंतु, महायुतीत ही जागा शिवसेनेकडे कायम राहिली. बारणे यांनाच उमेदवारी मिळाली.
मागील दहा वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे, महायुतीमधील मित्र पक्षाच्या सहकार्याने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर.मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना (Mp Shrirang Barne) उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षाकडून आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारणे यांची ही तिसरी निवडणूक आहे.खासदार श्रीरंग बारणे मागील दहा वर्षांपासून मावळचे प्रतिनिधित्व संसदेत करत आहेत. 2014, 2019 मध्ये ते मोठ्या मताधिक्याने मावळमधून निवडून गेले. आता तिसऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने खासदार बारणे यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने मावळवर दावा केला होता. परंतु, महायुतीत ही जागा शिवसेनेकडे कायम राहिली. बारणे यांनाच उमेदवारी मिळाली.मागील दहा वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे, महायुतीमधील मित्र पक्षाच्या सहकार्याने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.