महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग राज्यस्तरीय आढावा बैठक यशस्वीरित्या संपन्न.

PCC NEWS

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग राज्यस्तरीय आढावा बैठक यशस्वीरित्या संपन्न.

पिंपरी चिंचवड दि. ११ फेब्रूवारी २०२४ माननीय श्री. नानाभाऊ पटोले साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य व माजी मंत्री श्री. चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. नानाभाऊ गावंडे (संघटन व प्रशासन ) सेल विभाग मुख्य संयोजिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे यांच्या सूचना व आदेशा प्रमाणे व प्रदेश प्रमुख श्रीमती डॉक्टर दीपा चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग, तसेच प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे उपस्थितीत राज्यस्तरी बैठक टिळक भवन दादर येथे संपन्न झाली.

1

सामाजिक न्याय विभाग राज्यस्तरीय आढावा बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी मुलाचे मार्गदर्शन केले तसेच चंद्रकांत हांडोरे साहेब व प्रज्ञा वाघमारे मॅडम यांनी आजच्या देशातील घडामोडी व भाजपाच्या हुकूमशाहीच्या राजकारणाला हाणून पाडण्यासाठी सामाजिक न्याय विभागाद्वारे पुढील काळात कशाप्रकारे काम करावे याबाबत अत्यंत महत्त्वाचे सखोल मार्गदर्शन केले.

2

कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती डॉक्टर दीपा चक्रवर्ती यांनी सामाजिक न्याय विभागाची धुरा हाती घेतल्यापासून आजपर्यंतचा कार्य अहवाल सादर केला व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांना पदस्थ केले. व त्याचबरोबर सर्व पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांनी कशाप्रकारे सामाजिक न्याय विभागाचे काम करावे व प्रशासकीय बाबींच्या बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ए आय सी सी च्या जशा इलेक्शन काळात वॉर रूम असतात तशाच वॉर रूम विभाग व सेल यांच्याही असाव्यात जेणेकरून आपल्याला त्या त्या विभागाच्या सेलच्या परिसरातील अडचणी मतदारांचे प्रश्न जाणून घेता येतील त्याचबरोबर आपल्याकडे तेथील मतदारांची आकडेवारी व आपल्या उमेदवाराविषयी असलेले सर्व माहिती संकलित करता येईल व त्यानुसार त्या प्रभागामध्ये आपल्याला मत परिवर्तन करताना सोपे होईल अशी मागणी करताच बैठकीत उपस्थित असलेल्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले व सेलच्या प्रमुख प्रज्ञाताई वाघमारे यांनी मान्यता दिली व तशा प्रकारचे आदेशाचे पत्र बनविण्याचे सांगितले त्याचबरोबर माननीय श्रीमती दीपा चक्रबोर्ती यांनी सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व त्यांच्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्रांचे वाटप केले.

प्रदेश प्रमुख यांनी दोन महिन्यात ३४ जिल्हे बांधून सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाला वेगवान गती दिल्यामुळे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे व पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख एडवोकेट अशोक धायगुडे यांनी मॅडम यांचा पुणेरी पगडी, शॉल, भक्ती शक्ती शिल्प व पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार केला. तसेच प्रज्ञाताई वाघमारे महाराष्ट्रातील सेल व विभाग प्रमुख यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा यशस्वी पूर्ण केल्या बद्दल व प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा तीन वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल नानाभाऊ पटोले यांचा ही केक कापून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला व पुढील कार्यास सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

काल झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्रातील सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारिणी आढावा बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली.

TAGGED:
Share This Article
Leave a comment