पंतप्रधान यांच्या हस्ते पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेचे भूमिपुजन संपन्न..

PCC NEWS

पंतप्रधान यांच्या हस्ते पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेचे भूमिपुजन संपन्न..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी मेट्रो मार्गिकेचे भूमीपूजन ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आले. या भूमीपुजन कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते. यावेळी पिंपरी मेट्रो स्टेशन येथे या भूमिपुजन कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणाचे आयोजन पिंपरी येथे करण्यात आले होते. पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचा ४.५१ किलोमीटरचा विस्तार हा पिंपरी आणि निगडी दरम्यानचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल, ज्यामुळे रहिवाशांना वाहतुकीचा एक अखंड आणि सोयीस्कर मार्ग निर्माण होणार आहे.
या कार्यक्रमास खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, आयुक्त शेखर सिंह, माजी महापौर योगेश बहल, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसदस्य शंकर जगताप, नामदेव ढाके, राजू दुर्गे, विलास मडिगेरी, सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे,सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त मिनीनाथ दंडवते, मनोज लोणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिकेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच शहरातील खासदार, आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधींचे, शहरवासियांचे, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचे मनापासून आभार मानतो, त्यांच्या सहकार्यामुळे पायाभरणीपर्यंत या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळवून देण्यात यश प्राप्त झाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना दर्जेदार सोयीसुविधा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी नागरिकांच्या सुलभ प्रवासासाठी विस्तृत रस्ते, पदपथ, सायकल मार्ग यांचा विचार करून सातत्याने त्याबाबत उपाययोजना करत असते. तसेच दिवसेंदिवस मेट्रोचे जाळेही शहरात पसरत आहे आणि यामुळे शहरवासियांना सोयीस्कर प्रवासासाठी सोय उपलब्ध होणार आहे. दापोडी ते पिंपरी या मार्गावर सद्यस्थितीत मेट्रो सुरू असून मेट्रोमुळे कमी वेळात जलद गतीने प्रवास करणे सोपे झाले आहे. आज झालेल्या पिंपरी ते निगडी मेट्रोच्या भूमिपुजनामुळे पिंपरी, चिंचवड, निगडी, किवळे, रावेत, तळवडे येथील तसेच आजबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही प्रवासाची पर्यायी सोय उपलब्ध होणार आहे. तसेच यामुळे शहरातील रस्त्यांवरील रहदारीवरील ताण तसेच वाहनांमुळे होणारे प्रदुषण कमी होण्यास मदत मिळणार असून याशिवाय इंधनाची बचतही होणार आहे. पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती ही विस्तारित ४.५१ किलोमीटर लांबीची मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला आणखी गती तसेच शहरवासियांची स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज पुर्ण होणार आहे, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.
यापूर्वी ६ मार्च २०२२ रोजी पिंपरी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे या पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय या ६.९१ किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक या ४.७५ किमीच्या मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते १ ऑगस्ट २०२३ रोजी झाले होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment