पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाच्या अध्यक्षपदी भीमराव तुरुकमारे.

PCC NEWS

पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाच्या अध्यक्षपदी भीमराव तुरुकमारे. 

पिंपरी चिंचवड दिनांक :०७ फेब्रुवारी २०२४ अखिल मराठी पत्रकार संस्था सलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया सलग्न पिंपरी चिंचवड डिजिटल मीडियाची २०२४ -२५ लोकशाही पध्दतीने निवडणूक घेण्यात आली.

दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली त्या मध्ये भीमराव तुरुकमारे,मुकेश जाधव,आणि श्रीधर जगताप यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रत्येकाला माघारी घेण्यासाठी वेळ देण्यात आली.मुकेश जाधव व श्रीधर जगताप यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले. भीमराव तुरुकमारे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने यांची निवड करण्यात आली अखेर भीमराव तुरुकमारे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

या वेळी अखिल मराठी पत्रकार संस्था संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी शुभेच्छा दिल्या.संघ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ तसेच पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया हे बापूसाहेब गोरे यांच्या मार्गदर्शना खाली काम करीत आहेत.

निवडणूक प्रक्रीया अत्यंत साध्या परंतु लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडली. यावेळी शफीक चांद शेख, मुकेश जाधव, श्रीधर जगताप, विनोद शिंदे,माणिक पौळ,प्रसाद बोरसे ,लक्ष्मण रोकडे,प्रा. यशवंत गायकवाड, मुकुंद कदम, आदी सभासद यावेळी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पिंपरी चिंचवड शहर संघाचे सरचिटणीस महेश मंगवडे यांनी काम पाहिले नंतर बापूसाहेब गोरे,सायलीताई कुलकर्णी,दादाराव आढाव यांनी नवनिर्वाचित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पत्रकार संतोष जराड,संजय बोरा,विनय लोंढे, कलिंदर शेख,अमोल डंबाळे, सुहास आढाव,आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment