कर्तव्यावर असताना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन.
पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलीस धनाजी भरत वणवे (वय ४२) यांचे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कात्रज मंडई चौकात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावर असताना ही घटना घडली.
बुधवारी ६.४५ च्या सुमारास भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील धनाजी भरत वणवे हे कात्रज मंडई चौकात कर्तव्यावर असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी साई स्नेह रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपाचारापूर्वीच त्यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
वणवे यांच्या निधनाने सहकारी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.
Respect For Guru; गुरु के प्रति सम्मान व्यक्त करती श्रेया की कथक मंच पर एंट्री।