‘देश भगत युनिव्हर्सिटी’कडून आंतरराष्ट्रीय MD अभ्यासक्रम; ‘Growth Strategy Meet 2026’मध्ये जागतिक करिअरवर भर
Share
1 Min Read
Pimpri Chinchwad city newsReporter Yunus Khatib
SHARE
‘देश भगत युनिव्हर्सिटी’कडून आंतरराष्ट्रीय MD अभ्यासक्रम; ‘Growth Strategy Meet 2026’मध्ये जागतिक करिअरवर भर
पुणे / पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘देश भगत युनिव्हर्सिटी’तर्फे आंतरराष्ट्रीय MD अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत तसेच आकुर्डी येथे झालेल्या “Growth Strategy Meet 2026” कार्यक्रमात देण्यात आली.
४ व ५ वर्षांच्या कालावधीचे हे MD अभ्यासक्रम भारतातील MBBS समकक्ष असून परवडणाऱ्या शुल्कात उपलब्ध असणार आहेत. अभ्यासक्रमात सैद्धांतिक शिक्षणासोबत परदेशातील रुग्णालयांमध्ये क्लिनिकल प्रशिक्षणाचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना USMLEसह यूके व कॅनडा परवाना परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रवेशासाठी १२वी सायन्स व NEET उत्तीर्ण असणे आवश्यक असून ‘D-Best Global MD’ प्रवेश परीक्षेद्वारे निवड केली जाणार आहे. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमामुळे भारतीय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉक्टर होण्याचे नवे मार्ग खुले होतील, असा विश्वास विद्यापीठाकडून व्यक्त करण्यात आला.