राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहराध्यक्ष कविता आल्हाट यांच्या वतीने वृक्षारोपण.
पिंपरी चिंचवड दिनांक २२ जुलै २०२५ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहराच्या महिला अध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांच्या वतीने मोशी परिसरातील विविध सोसायटीमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.
यावेळी वेगवेगळ्या प्रकारची झाडे या प्रभागात लावण्यात आली. महिला ,जेष्ठ नागरिक, युवक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिसरातील अनेक नागरिकांनी येथे उपस्थित राहून उस्फुर्त असा सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना कविता आल्हाट म्हणाल्या की वृक्ष संवर्धन, जतन करणे ही काळाची गरज आहे. आपल्याला झाडांपासून प्राणवायू मिळतो. त्यामुळे आपला प्रभाग व आजूबाजूचा परिसर , स्वच्छ व हिरवा राहण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

Respect For Guru; गुरु के प्रति सम्मान व्यक्त करती श्रेया की कथक मंच पर एंट्री।