महात्मा फुलेंचे कार्य समजून घेण्यासाठी सत्यशोधक चित्रपट अवश्य पाहा!
Yunus khatib 9420554065
पिंपरी चिंचवड (चित्रपट विशेष) क्रा सावित्रीबाई यांच्या कार्यावर प्रकाश व्यक्तिरेखा जिवंत पाहावयास मिळाल्या. सत्यशोधक चित्रपट नुकताच पाहण्यात आला. ज्योतिबा व सावित्रीबाईनी कुठल्या विपरीत काळात लढा दिला त्याची कल्पना हा चित्रपट पाहून येते. चित्रपट पाहताना किमान ३-४ वेळा गहिवरून येते. हे दिग्दर्शकाचे यश निश्चितपणे मान्य करावेच लागेल.
जे समजून घ्यायला मोठमोठी पुस्तक वाचावी लागतील, भ्रमंती करावी लागेल ते केवळ दोन-अडीच तासात समजावून देणे सोपे कार्य नसते. OMG, Pk सारख्या चित्रपटांनी अतिशय प्रभावीपणे जे कार्य केले आहे, त्याच पठडीतील हा चित्रपट नक्कीच आहे. थॉमस पेन यांनी लिहिलेल्या मानवी हक्कावरील पुस्तकाने ज्योतिरावांच्या विचाराला दिशा दिली होती हे लक्षात येते.
या चित्रपटात क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे, कामगार नेते नारायण लोखंडे, फातिमा शेख, दीनबंधू वृत्तपत्राची धुरा सांभाळणारे कृष्णराव भालेकर व ज्योतिबांनी घर सोडल्यानंतर ज्यांच्या घरी वास्तव्य केले ते उस्मान भाई शेख आणि सर्वात शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी त्या काळी पुण्यासारख्या ब्राह्मणबहूल काळात लोक जाती धर्माचे भेद विसरून नगरातून ज्या प्रकारे ज्योतिरावांनी आणि एकमेकांना कसे मदत करायचे, हे दाखवणारे कितीतरी प्रसंग या चित्रपटात संघर्ष आहेत.
फुलेंनी धरणातील कामात भ्रष्टाचार करण्याची दिलेली ताकीद दलितांना आपल्या वाड्यातील विहीर पाणी भरायला मोकळी करून दिली आत्महत्या करायला लहुजी वस्ताद साळवे यांनी केला, त्यातून ज्योतिरावांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची, पेशवाईची व आंबेडकरांनी नंतरच्या काळात मनुस्मृती का जाळली याची कल्पना येते.आत्महत्या करणाऱ्या मुलींना वाचवून घरी आश्रय देऊन तिचे मूल सांभाळणे, असे काही प्रसंग अतिशय प्रभावी ठरले आहेत.
विशेष..
‘सत्यशोधका’ हे गाणे तर सर्वात उत्साहवर्धक आहे. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर ते आपण निश्चितपणे गुणगुणत राहाल, याची मला खात्री आहे.
‘सत्यशोधका’ हे गाणे तर सर्वात उत्साहवर्धक आहे. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर ते आपण निश्चितपणे गुणगुणत राहाल, याची मला खात्री आहे.
हा चित्रपट पाहिल्याने काही प्रेरणा मिळून आपल्या संघर्षाला नक्कीच धार येईल यावर माझा विश्वास आहे. महात्मा फुले यांनी गरीब शेतकऱ्याच्या वेषात ब्रिटिश पाहुण्यांच्या (Duke of Connaught) कार्यक्रमात भेटायला जाऊन गरीब शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या प्रकारे मांडल्या तो महत्त्वाचा प्रसंग या चित्रपटात दाखवला असता, तसेच मध्यंतरापूर्वी सहकाऱ्यांसोबत मतभेद
झाल्यामुळे फुले त्यांच्यापासून विभक्त होतात आणि मध्यंतरानंतर एकदमच महात्मा फुले यांनी धरणाचे जे कंत्राट घेतलेले दाखवलेय त्यादरम्यानचा संघर्ष थोडासा दाखवायला हवा होता मात्र विस्तारभयास्तव तो दाखवला नसावा.
झाल्यामुळे फुले त्यांच्यापासून विभक्त होतात आणि मध्यंतरानंतर एकदमच महात्मा फुले यांनी धरणाचे जे कंत्राट घेतलेले दाखवलेय त्यादरम्यानचा संघर्ष थोडासा दाखवायला हवा होता मात्र विस्तारभयास्तव तो दाखवला नसावा.