संजोग वाघेरे यांना वेल्फेयर पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा.

PCC NEWS

संजोग वाघेरे यांना वेल्फेयर पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा.

पिंपरी (प्रतिनिधी):- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पिंपरी चिंचवड शहर वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाकडून पाठींबा देण्यात आला आहे.

पिंपरी येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी खासदार संजय राऊत यांचे उपस्थितीत उमेदवार संजोग वाघेरे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. वाघेरे यांनी पाठिंब्याचे‌ पत्र स्वीकारत सर्वांचे आभार मानले.

या प्रसंगी वेल्फेअर पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सालार शेख, पुणे जिल्हाध्यक्ष जावेद सौदागर, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अमिल सैफी, खाजाभाई नदाफ, इब्राहिम शेख, तौसिफ पठाण, सलीम नदाफ, चांदभाई शेख, उस्मानभाई शेख, तैय्यब चौधरी, अय्यूब शेख, फजल पटेल, ज्ञानेश्वर माशाळकर, हबीब शेख, समीर शेख, हुशेन शेख, येहसान भाई, मारुती काळे, फारुक गप बागवान, इरफान शेख, इमरान शेख यांच्यासह वेल्फेअर पार्टीतील युवा आघाडी व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment