विद्यानंद भवन हायस्कूल निगडी हायस्कूलमध्ये पूर्वा राकेश पगारे ९७.६०% गुण मिळवून पहिली.

PCC NEWS
1 Min Read
पूर्वा राकेश पगारे

पिंपरी चिंचवड दिनांक : १३ मे २०२५ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आणि या वर्षीही निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूलने १००% निकाल मिळवला.

एकूण १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते त्यापैकी ८४ विद्यार्थ्यांनी विशिष्ट गुण मिळवले, ५० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आणि ७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली.

पूर्वा राकेश पगारे या विद्यार्थ्यांनी ने ९७.६०% गुण मिळवले आणि शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिने कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला नव्हता आणि ती पूर्णपणे स्वतःच्या अभ्यासावर आणि तिच्या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनावर अवलंबून होती.

रुही फडणीस या विद्यार्थ्यांनीला ९६.६०% गुण मिळवले आणि शाळेत दुसरे स्थान मिळवले तर चेतना चंदन या विद्यार्थ्यांनीला ९६% गुण मिळवून शाळेत तिसरे स्थान मिळवले.

अध्यक्ष डॉ. भरत चव्हाण पाटील, संचालक डॉ. श्वेता भरत चव्हाण पाटील, सचिव प्रा. डी.आर. करनुरे, प्राचार्य श्री. सिरिल अँथनी जगन यांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यातील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

TAGGED:
Share This Article
1 Comment