पुणे : अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने छ. शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने ऐतिहासिक लाल महाल येथे “शिवमहोत्सव सोहळा : 2025” आयोजित करण्यात आला दि. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:00 वा. सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मानवंदना देण्यात आली.
यावेळी बोलताना महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. विकास पासलकर म्हणाले, ज्या लाल महाल या वास्तुमध्ये माँसाहेब जिजाऊ यांनी जात, धर्म नं पाहता रयतेच्या कल्याणाचा विचार शिवबांच्या मनात रुजवला. त्या लाल महालात आज सर्व जाती धर्माचे मावळे जमून शिवरायांना मानवदंना देतं आहेत, हा आनंदाचा क्षण आहे.
शिव छत्रपतींचे स्वराज्य या अर्थाने धर्मनिरपेक्ष स्वराज्य होते. हाचं गाभा आधुनिक भारताच्या संविधानाचा आहे.सर्व शिवप्रेमीनी स्वराज्याचा हा गाभा समजून घेवून आजच्या संविधान रक्षणाचे काम करावे, या हेतूने आज लाल महालात संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन ही घेण्यात आले.
या वेळी उपस्थित इकबाल शेख यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना जयंतीच्या निम्मिताने सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठीच्या प्रयत्नांची प्रेरणा म्हणजे लाल महाल असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास ऍड. फैयाज शेख इकबाल शेख इम्तियाज शेख शाबीर सय्यद परमजित सिंग राजपाल चरणजित सिंग दिगवा इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत धुमाळ यांनी केलें, मान्यवरांचे स्वागता हनुमंत पवार यांनी केलें. सूत्रसंचालन विराज तावरे यांनी केलें तर आभार निलेश इंगवलेयांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज ढवळे मयूर शिरोळे रोहित तेलंग सचिन जोशी सिकंदर शेख यांनी सहकार्य केले.